येथील हृदय इव्हेंट ग्रुप आणि शहादा येथील इन्कलाब ब्रिगेड ग्रुप यांच्या सौजन्यांने दुधाळे गावातील शेतमजूर आणि गरजू 250 लोकांना दिवाळी निमित्त कपडे,साडया वाटप करण्यात आले.
यात जुनी, नवी अशा सर्वं प्रकारचे कपडे स्वयंसेवकांनी लोकांच्या मदतीने व स्वतः जमा केली होती. त्यात लहान मुलं-मुलींची व मोठ्यांचे कपडे तसेच महिलांसाठी साड्या अश्या एकूण 250 गरजू लोकांना कपडे वाटप करण्यात आले.कपडे मिळाल्यानंतर
चिमुकल्याचया चेहऱ्यावर आनंद पाहून हदय इव्हेंट टीमने सामाजिक कार्यात सदैव सहभागी होण्याचे ठरवले. हदय इव्हेंट विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवणार आहेत, उपक्रमासाठी हृदय इव्हेंट्सचे कुशल कवाड आणि पूनम भावसार यांनी परिश्रम घेतले. त्यासोबत शुभम पाटील, अबीद शेख, जिग्नेश, दिव्या भारती , कल्याणी दातीर, ममता चौधरी, निकिता मराठे, आबिद शेख, शुभम पाटील,जिग्नेश राना,अनस टिमोल, आणि इन्कलाब ब्रिगेड शहादा यांचे सहकार्य लाभले.
दिवाळी सारखा सण सर्वांसाठी पर्वणीच असतो. दिवाळीत आपण हजारो रुपये खर्च करून आनंद विकत घेत असतो. पण शेकडो गरीबाच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करू शकलो तरच खरी दिवाळी समजावी असं मत पुनम भावसार यांनी व्यक्त केले.








