नंदुरबार l प्रतिनिधी
सेवानिवृत्त झालेल्या अमंलदारांना कधीही असे वाटू नये की , आपण पोलीस दलात कार्यरत असतांना अनेक सामान्य व्यक्तींच्या अडचणी प्रश्न , तक्रार सोडविल्या , परंतु सेवानिवृत्ती नंतर आपल्याला कोणी विचारणार नाही असे वाटू नये यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सेवानिवृत्त पोलीस अमंलदांसोबत दिवाळी साजरी केली .
सेवानिवृत्ती हा असा प्रसंग असतो की , सेवानिवृत्त होणान्यांसाठी काहीसा आनंदी तर काही दुःखी अशा दोन्ही क्षणांचा विचार त्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर असतात . यशस्वीरीत्या पोलीस दलाची सेवा केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून गणवेश परिधान करता येणार नाही किंवा रोजच्या दिनचर्ये प्रमाणे काम करता येणार नाही या विचाराने सेवानिवृत्त होणाऱ्यांचे मन दुःख होते , परंतु दुसऱ्याच क्षणात हा ही विचार येतो की , येणारा उद्याचा दिवस आपल्यासाठी एक नविन प्रवास सुरु करणारा असेल व नविन आयुष्यात प्रवेश करणारा असेल या विचाराने आनंद ही होत असतो , पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्याचा जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासुन नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सेवानिवृत्त झालेले सर्व पोलीस अधिकारी व अमंलदार यांच्या वेळोवेळी अडचणी ऐकुण त्या वेळेत सोडवल्या देखील आहेत . सेवानिवृत्त झालेल्या अमंलदारांना कधीही असे वाटू नये की , आपण पोलीस दलात कार्यरत असतांना अनेक सामान्य व्यक्तींच्या अडचणी प्रश्न , तक्रार सोडविल्या , परंतु सेवानिवृत्ती नंतर आपल्याच अडचणी कोणी सोडवणार नाही किंवा आपल्याला कोणी विचारणार नाही , म्हणून पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातुन सेवानिवृत्त झालेले सर्व पोलीस अधिकारी व अमंलदार यांचे सोबत यंदा दिवाळी साजरी करण्याचे ठरविले . त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातून यशस्वीरीत्या सेवानिवृत्त झालेले सर्व पोलीस अधिकारी व अमंलदार यांना पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार येथे बोलावून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देवून त्यांच्या सोबत फराळ केला . पोलीस दलातून यशस्वीरीत्या सेवा केल्यानंतर त्यांचा आदर करणे हे आपले कर्तव्य असुन सेवानिवृत्त पोलीस अमंलदारांचे जे काही प्रश्न , अडचणी असतील त्या लवकरात लवकर सोडविल्या जातील असे यावेळी पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सांगितले , नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर तसेच सेवानिवृत्ती नंतर पहिल्यांदा पोलीस अधीक्षक यांनी त्यांच्या सोबत फराळाला बोलविले यापूर्वी आम्हाला कधीही असे कोणी बोलावून आमच्या अडी अडचणींची विचारपुस केली नाही , म्हणून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अमंलदार यांचे संघटनेच्या वतीने आभार व्यक्त केले . यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , पोलीस उप अधीक्षक ( मुख्यालय ) , नंदुरबार विश्वास बळवी , उप विभागीय पोलीस अधिकारी , नंदुरबार सचिन हिरे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , हे उपस्थित होते.








