नंदुरबार l प्रतिनिधी
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी व विद्यार्थींनीना सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षांसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिकआदिवासी विकास प्रकल्प, तळोदा अंतर्गत सुरु असलेल्या 17 शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेशासाठी अर्ज सादर करावे.
प्रवेशासाठी इयत्ता आठवी, अकरावी, प्रथम वर्ष पदवी, पदविका, पदव्युत्तर, डी. टी. एड, बी.एड साठी वसतीगृहातील रिक्त जागेनुसार व गुणवत्तानिहाय प्रवेश देण्यात येईल. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी https://swayam.Mahaonline.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशासाठी अर्ज सादर करावे असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे.








