तळोदा | प्रतिनिधी
तळोदा येथील चिनोदा चौफुलीला तंट्या मामा नाव देण्यात यावे यासाठी बिरसा फायटर्सतर्फे तळोदा मुख्याधिकारी यांच्याकडे
निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दि.३१ मार्च २०२१ रोजी दिलेल्या निवेदनाची कार्यवाही न झाल्याचे दिसून येत आहे. या देशाला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास महत्त्वाचा आहे. सातपुडा डोंगरातील अनेक भिल्ल नायकांनी इंग्रजाविरुद्ध प्रखर लढा दिला. त्यात तंट्या मामा भिल्ल यांनी अन्याय करणारे इंग्रज, जमीनदार, सावकार यांच्याविरुद्ध प्रखर लढा देवून सातपुडा पट्ट्यात गरीब लोकांचे व आदिवासींचे संरक्षण केले. सातपुडा पट्ट्यात त्यांना प्रेमाने ‘मामा’ म्हणत. त्यांच्या वागण्यातून सत्य, न्याय, दया आणि प्रेम ही तत्वे प्रकट होत होती. म्हणून तमाम आदिवासींसकट सर्व जनतेच्या भावनांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आदिवासीबहुल जिल्ह्यातील तमाम जनतेचे रक्षणकर्ते, प्रेरणास्थान, आधारस्तंभ जननायक तंट्या मामा भील यांचे नाव देण्यात यावे.
निवेदनावर बिरसा फायटर्स राज्य महासचिव राजेंद्र पाडवी, जिल्हा कार्याध्यक्ष भरत पावरा, विभागीय संघटक जगदीश वळवी, तालुकाध्यक्ष सुभाष पावरा, राजू प्रधान, विरसिंग पाडवी, संतोष गावीत, बारक्या पावरा, रतिलाल पावरा, जगन पाडवी, सायक पावरा, विजय खर्डे आदींसह २० ते २५ बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांच्या सह्या आहे.