Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोळदे गटातून डॉ.सुप्रिया गावीतांविरोधात शिवसेनेतर्फे नंदुरबारचे उपनगराध्यक्ष रविंद्र पवार उमेदवार अर्ज दाखल करणार?

team by team
July 4, 2021
in राजकीय
0
कोळदे गटातून डॉ.सुप्रिया गावीतांविरोधात शिवसेनेतर्फे नंदुरबारचे उपनगराध्यक्ष रविंद्र पवार उमेदवार अर्ज दाखल करणार?

कोळदे गटातून डॉ.सुप्रिया गावीतांविरोधात शिवसेनेतर्फे नंदुरबारचे उपनगराध्यक्ष रविंद्र पवार उमेदवार अर्ज दाखल करणार?
नंदुरबार| प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या ११ गटांची पोटनिवडणुक होत आहे. अद्याप नंदुरबार जिल्ह्यात तीन जणांचे सात नामांकन दाखल करण्यात आले आहे. नंदुरबार तालुक्यातील कोळदे गटात डॉ.सुप्रिया गावीत यांनी भाजपातर्फे नामांकन दाखल केले आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेतर्फे नंदुरबार पालिकेचे उपनगराध्यक्ष रविंद्र पवार हे आज अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
नंदुरबार तालुक्यातील कोळदा, खोंडामळी, शनिमांडळ, रनाळा,  कोपर्ली या जिल्हा परिषद गटांची पोटनिवडणुक लागली आहे. कोपर्ली गटातून शिवसेनेतर्फे ऍड.राम रघुवंशी यांनी अर्ज दाखल केला आहे. तर कोळदे गटातून आ.डॉ.विजयकुमार गावीत यांची सुपूत्री डॉ.सुप्रिया गावीत यांनी भाजपातर्फे नामांकन दाखल केले आहे. त्यांच्यासमोर शिवसेनेतर्फे कोण उमेदवार राहिल. याबाबत नागरीकांमध्ये उत्सुकता होती. मिळालेल्या माहितीनुसार, कोळदे गटातून डॉ.सुप्रिया गावीत यांच्या विरोधात शिवसेनेतर्फे नंदुरबारचे उपनगराध्यक्ष रविंद्र पवार हे नामांकन दाखल करण्याची शक्यता आहे. तर कोपर्ली गटातून ऍड.राम रघुवंशी यांच्या विरोधात गावीत परिवारातील सदस्य नामांकन दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोपर्ली व कोळदे गटात काटयाची टक्कर पाहायला मिळणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. असे असले तरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे बच्चू कडूंच्या वाढदिवसानिमित्त प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे वृक्षारोपण

Next Post

खांडबारा येथे ११ हजाराची देशी, विदेशी दारु जप्त

Next Post
खांडबारा येथे ११ हजाराची देशी, विदेशी दारु जप्त

खांडबारा येथे ११ हजाराची देशी, विदेशी दारु जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026
सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

February 20, 2026
शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

February 20, 2026
नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूक-२०२५; निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

February 20, 2026
अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

February 20, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add