नंदुरबार| प्रतिनिधी
दिवाळीच्या पार्श्वभुमीवर नंदुरबार तालुक्यातील १८७ स्वस्त धान्य दुकानदारांना नोव्हेंबर २०२१ मध्ये अंत्योदय अन्न योजनेचे १६ हजार ४६८ व प्राधान्य कुटूंबिय योजनेतील १ लाख ९५ हजार ८१० सदस्यांना अन्नसाठा पोहच करण्यात आल्याची माहिती नंदुरबारचे तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
दि.१ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी सण साजरा करण्यात येणार आहे. त्याकरीता नंदुरबार तालुका पुरवठा विभागातर्फे तालुक्यातील १८७ स्वस्त धान्य दुकानदारांना नोव्हेंबर २०२१ मध्ये अंत्योदय अन्न योजनेचे १६ हजार ४६८ व प्राधान्य कुटूंबिय योजनेतील १ लाख ९५ हजार ८१० सदस्यांना नियमीत अन्न धान्य नियतन दि.२० ऑक्टोबरपासून मंजूर करून आतापर्यंत तालुक्यातील १८७ स्वस्त धान्य दुकानदारांना अन्नधान्यसाठा पोहोचत करण्यात आला आहे. यात अंत्योदय गहू २३ किलो प्रतिकार्ड तांदुळ १२ किलो प्रतिकार्ड, साखर एक किलो, तर प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजना यात गहू २ किलो प्रति व्यक्ती, तांदुळ ३ किलो प्रति व्यक्ती देण्यात येणार आहे. अंत्योदय व प्राधान्य कुंटूंब योजनेकरीता प्रति दोन रूपये किलो गहू व तांदुळ तीन रूपये किलो व साखर अंत्योदय कार्ड धारकांना प्रतिकार्ड एक किलो २० रूपये याप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे. सदर धान्य दि.२ नोव्हेंबरपासून सकाळी ८ ते १२ व दुपारी २ ते ६ या कालावधीत स्वस्त धान्य दुकानदारामार्फत वाटप करण्यात येणार आहे. तरी पात्र शिधा धारकांना यावेळेत स्वस्त धान्य दुकानावर जावून स्वस्ताचा अंगठा पॉस मशिनवर प्रमाणीत करून अन्नधान्य व साखर उचल करावी. धान्य वितरणाबाबत काही तक्रारी असल्यास तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखेत संपर्क साधावा असे आवाहन तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी केले आहे.