तळोदा । प्रतिनिधी
चिनोदा : महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत घटक कृषि तंत्र विद्यालय धुळे येथे सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया दि.१८ ऑक्टोबर २०२१ ते दि.२९ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत कृषि तंत्र विद्यालय धुळे येथे पार पडली. या प्रवेश प्रक्रियेसाठी धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील कृषि विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी प्रवेश प्रक्रिया यशस्वी, सुलभ व सुरळीतपणे पार पाडली यासाठी प्रशस्तीपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे घटक कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य तथा ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया समितीचे अध्यक्ष डॉ.प्रा.राहुल देसले हे होते.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार व धुळे घटक कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य तथा धुळे-नंदुरबार जिल्हा ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया समितीचे अध्यक्ष डॉ.प्रा.राहुल देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील कृषि तंत्र पदविका अभ्यासक्रम ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया कृषि तंत्र विद्यालय धुळे येथे यशस्वीपणे राबविण्यासाठी सहाय्य करून उत्कृष्टपणे वेळेत तसेच प्रवेश प्रक्रिया सुलभ व सुरळीतपणे पार पाडणाऱ्या ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया समितीतील सदस्य यात धुळे घटक कृषि विद्यालयाचे कनिष्ठ संशोधन सहाय्यक एस.बी.आगळे, कनिष्ठ संशोधन सहाय्यक एस.आर.भारूड, कृषि सहाय्यक जी.आर.सोनवणे, कृषि सहाय्यक एस.एस.मराठे, वरिष्ठ लिपीक के.टी.पाटील, के.एच.वानोळे, ए.टी.माळी, उमर्दे कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य के.जी.मराठे, कनिष्ठ संशोधन सहाय्यक व्ही.सी.बच्छाव, योगेश पाटील, मेहेरगाव कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य सरला पवार, लिपिक पी.एस.खरे, मंदाणे कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य एस.एल.वाघ, कृषि सहाय्यक प्रविण बोरसे, साक्री कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डी.आर.बिरारीस, रांझणी कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य प्रविण वसावे, कृषि सहाय्यक आर.बी.पाडवी, लिपीक दिपक मराठे, संगणक परिचारक जे.बी.वानखेडे, बोराडी कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य एम.के.माहेश्वरी तसेच स्वयंसेवक दुर्गेश देसले, उमेश कोटेचा, अनिकेत येलमार, तुषार माळी, वैभव मोरे, रितेश कोळेकर आदींचा धुळे घटक कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रा.राहुल देसले यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन एस.बी.आगळे यांनी केले.