नवापूर | प्रतिनिधी
नवापुर येथील अग्रवाल भवन येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल नवापुर प्रखंड द्वारा आयोजित रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी माजी जि.प.अध्यक्ष तथा भाजपा नवापुर तालुकाध्यक्ष भरत गावित यांनी सदिच्छा भेट दिली.
नवापुर येथील अग्रवाल भवन येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल नवापुर प्रखंड द्वारा आयोजित रक्तदान शिबिराप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे निलेश देसाई यांनी भरत गावित यांचे स्वागत करत आभार मानले. यावेळी भरत गावित यांनी रक्तदात्यांची विचारणा करत आपण करत असलेलं कार्य समाजासाठी अभिमानास्पद बाब आहे.आयोजकांचे आभार मानत समाजकार्यासाठी रक्तदान विशेष कार्य आहे. असे त्यांनी आपल्या मनोगतातून भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे राज सोनी, निलेश देसाई, शामराव गावित, जिग्नेश पंचाल,जगदीश जयस्वाल तसेच लाजरस गावित,अजय गावित सह रक्तदाते बंधू-भगिनी तसेच रक्तपेढीचे डॉक्टर्स टीम उपस्थित होते.