धडगाव l प्रतिनिधी
जिल्ह्यात लसीकरणासाठी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने गृप ग्रामपंचायत राजबडीॅ अंतर्गत 2 व 3 नोव्हेंबर रोजी विविध गावांमध्ये कोरोना लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. लसिकरणासाठी दवंडी देऊन जनजागृती करण्यात येत आहे.

आगामी सण, उत्सवाची पार्श्वभूमी लक्षात घेता संसर्ग वाढू नये तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रादूर्भाव टाळण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी 2 व 3 नोव्हेंबर रोजी आरोग्य विभागाच्यावतीने ग्रामीण व शहरी भागात विशेष लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अनुषंगाने गृप ग्रामपंचायत राजबडीॅ अंतर्गतही शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी
राजबडीॅ ग्रुप ग्रामपंचायततर्फे विविध पाड्यांवर जाऊन लसिकरणासाठी दवंडी देऊन जनजागृती करण्यात येत आहे.
राजबडीॅ ग्रुप ग्रामपंचायततर्फे २ नोव्हेंबर रोजी राजबडीॅ प्रा.आ.केंद्र,राजबडीॅ अंगणवाडी, त्रिशूल प्रॉपर अंगणवाडी, शेलकुई बुरखेतपाडा अंगणवाडी तर ३ नोव्हेंबर रोजी राजबडी प्रा.आ.केंद्र, खुटवडा ( खालचा ) अंगणवाडी, त्रिशूल पल्हानीपाडा अंगणवाडी, शेलकुई – चिखलटीपाडा येथील अंगणवाडी येथे लसीकरणासाठी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरासाठी राजबडीॅ ग्रुप ग्रामपंचायततर्फे जय्यत तयारी असल्याचे ग्रामविकास अधिकारी आतिश चव्हाण यांनी दिली.








