प्रकाशा l प्रतिनिधी
प्रकाशा येथे प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत ३९०लाभार्थ्यांना खा,डॉ, हिना गावित यांना गॅस, शेगडी वाटप करण्यात आली.
भारत सरकारने प्रधानमंत्री उज्वला २, सुरू केली असून यात महिलांच्या आरोग्याची निगा ठेवण्यासाठी एक कल्याणकारी योजना आहे.त्याअंतर्गत प्रकाशा व परिसरातील ३९०लाभार्थ्यांना खा,डॉ, हिना गावित यांना गॅस, शेगडी वाटप करण्यात आले. यावेळी माजी मंत्री डॉ, विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ सुप्रिया गावित,जिल्हापरिषद माजी उपाध्यक्ष रामचंद्र दशरथ पाटील, हरी दत्तू पाटील, भारतीबाई ठाकरे, नेहा दामोदर चौधरी, सखाराम चौधरी , ईश्वर पाटील, किशोर मुरार पाटील, पंडित धनराले, धनराज पाटील, जंग्या रंग्या भिल, अरुण मट्या भिल,पत्रकार पूनम चव्हाण, तुकाराम लांबोळे आदी उपस्थित होते.
यावेळी खा.डॉ.हिना गावित म्हणाल्या की, जिल्ह्यात उज्वला योजना सर्व प्रथम आ.डॉ. विजयकुमार गावित यांनी आणली आहे.आणि ती आज पर्यंत सातत्याने आम्ही राबवत आहेत, ही योजना सर्व लाभार्थींना गॅस वाटप करीत आहोत.जिल्ह्यात दीड लक्ष पर्यंत लाभार्थींना गॅस सिलेंडर वाटप केले आहे, पुढचा काळात नव्वद हजार लाभार्थींना उज्वला गॅस वाटप करण्यात येणार आहे.तसेच उर्वरित लाभार्थी यांनाही मिळवण्यासाठी पाठपुरावा करून त्यांना उज्वला योजना ३ मध्ये लाभ देऊ असे खा,डॉ हिना गावित यांनी सांगीतले
यावेळी आ.डॉ. विजयकुमार गावित म्हणाले की ,जिल्ह्यात मोठे मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल उभारण्यात येत आहे.त्यात सातशे खाटांचे हॉस्पिटल असणार आहे ,सर्व आजार आपल्या जिल्ह्यातच बरे होतील,या ठिकाणी वैद्यकिय शिक्षणाचा लाभ मिळणार आहे , प्रत्येक गावात पिण्याचे फिल्टर्स प्लॅन बवण्याचे उद्दिष्ट आहे,येणार्या काळात सर्वांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देऊ असे डॉ .विजयकुमार गावित यांनी सांगीतले, प्रकाशा येथील वेदांत इंडेन ग्रामीण वितरकांनी गॅस, शेगडी वाटप नियोजन केले.यावेळी गणेश भोई, पंकज जावरे, स्वप्नील कुलकर्णी वेदांत इंडेन ग्रामीण वितरक चे संचालक दामूभाई सखाराम चौधरी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.










