नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.राकेश वसंत पाटील यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे राज्यस्तरीय गुणीजन गौरवपुरस्कार अंतर्गत राज्यस्तरीय आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार २०२० प्रदान करण्यात आला.
दरवर्षी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे विविध पुरस्कार देण्यात येतात. यात वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण पूरक उपक्रमात सक्रीय सहभाग घेणार्या सदस्यांना विविध पुरस्कारांने गौरविण्यात येते. यात कोरोना प्रादुर्भावामुळे एकवर्ष उशिराने पुरस्कार प्रधान करण्यात आला. यात कोरोनाकाळात उत्कृष्ट वैद्यकीय सेवा बजावणार्या भालेर येथील डॉ.राकेश वसंत पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श युवक महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार २०२० मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचे ऍड.कृष्णा जगदाळे यांच्या हस्ते मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय गुणीजन गौरव पुरस्कार अंतर्गत पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंद होत आहे.








