नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खुर्दे येथे स्मित मल्ट्री स्पेशलिटी हॉस्पीटल व सागरभाऊ साळुंखे मित्र परिवारातर्फे महाआरोग्य तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबीरात १२५ नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
उमर्दे खुर्दे ता.नंदुरबार येथे स्मित मल्ट्री स्पेशलिटी हॉस्पीटल व सागरभाऊ साळुंखे मित्र परिवारातर्फे महाआरोग्य तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे विठ्ठल मंदिरात आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोटाचे गंभीर आजार, किडनीतील खडे यासह विविध आजारांची तपासणी करण्यात आली. यावेळी १२५ नागरीकांची तपासणी करण्यात आली. या शिबीराचे उद्घाटन सरपंच आरविंद ठाकरे, शिवसेना नंदुरबार उपतालुकाप्रमुख सागर साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला निलेश चव्हाण, जयेश मवाळ, गोरख जगताप, दिगंबर वसावे, निलेश बेंद्रे, जयेश मराठे, ज्ञानेश्वर मराठे, बंटी मराठे, चेतन मराठे, पंढरीनाथ मराठे, गणेश जगताप आदी उपस्थित होते. यावेळी रूग्णांचे तपासणी स्मित मल्ट्री स्पेशलिटी हॉस्पीटलचे आरएमओ डॉ.विशाल पाटील, डॉ.प्रविण धनगर, स्वेता पाडवी, विशाल केदार, संदिप गावीत यांनी केली. शिवसेनेचे नंदुरबार तालुका उपप्रमुख तथा उपसरपंच सागर साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त शिबीराचे आयोजन कर ण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागरभाऊ साळुंखे मित्र परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले.








