Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

team by team
April 2, 2026
in राज्य
0
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

नंदुरबार l प्रतिनिधी-

संत परंपरेचा अखंड वारसा जपत ब्रह्मलीन संत श्री. दगाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित जन्मभूमी चौपाळे ता. जि. नंदुरबार ते जल समाधी स्थळ नर्मदा आशा ता. झगडिया जि. भरूच गुजरात येथील निलोंभी आश्रम दिंडी यात्रेचा १८५ किलोमीटरचा प्रदीर्घ प्रवास आज भावपूर्ण वातावरणात पूर्ण झाला. नर्मदा तीरावर हजारो भाविकांच्या उपस्थितीत जलाभिषेक, आरती, आत्मज्योतीचे विसर्जन आणि महाप्रसादाने या ३३व्या दिंडी यात्रेची भक्तीमय सांगता झाली.

 

२४ मार्च रोजी संत श्री दगाजी महाराजांच्या जन्मभूमी चौपाळे येथून सुरू झालेल्या या दिंडी यात्रेत दररोज भजन, कीर्तन, नामस्मरण आणि शिस्तबद्ध पायी प्रवासातून भक्तांनी अध्यात्माचा अनुभव घेतला. संपूर्ण प्रवासात गावोगावी दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. दगाजी महाराज यांच्या पालखीच्या सोबत चालणाऱ्यांचा भाविकांचा आठ दिवसाच्या पायी दिंडीत हरे रामा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे चा जप दिंडीत सहभागी अविरत सुरू होता टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “जय नर्मदे हर”च्या घोषात वातावरण दुमदुमून गेले होते.

३० मार्च रोजी ही दिंडी अशा ता. झगडिया जि. भरूच गुजरात येथील नर्मदा काठावरील निलोंभी आश्रमात दाखल झाली. आज ३१ मार्च रोजी पहाटेपासूनच नर्मदा घाटावर भक्तांची गर्दी उसळली होती. नर्मदा मातेला जलाभिषेक करताना अनेक भाविकांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. ब्रह्मलीन संत श्री दगाजी महाराजांच्या आत्मज्योतीचे विसर्जन आणि पादुका पूजनाच्या वेळी संपूर्ण परिसर भक्तिभावाने भारावून गेला. यावेळी संतोष चैतन्य महाराज ट्रस्टचे पदाधिकारी सुमुल डेअरीचे चेअरमन भरतभाई पटेल, गुजर समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगदीशभाई पटेल निझरचे महेंद्र पाटील, अक्राळेचे रोहिदास राठोड आदि सह महाराष्ट्र गुजरात एम.पी. येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संत श्री दगाजी महाराज यांनी जिथे जलसमाधी घेतली त्या ठिकाणी नर्मदा पूजन, पादुकाचे पूजन, संतोष चैतन्य महाराज सह ट्रस्टी सपत्नीक पूजेस बसले पूजा विधीवत करण्यात आली. पौरोहित्य नंदुरबारचे प्रसिद्ध भागवतकार अविनाश महाराज व भागवतकार श्याम महाराज मुळे यांनी केले.

या यात्रेदरम्यान व्यसनमुक्ती, शिस्त आणि धार्मिक आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात आले. संतोष चैतन्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रामजी जाधव यांच्या सहकार्याने दिंडीचे नियोजन उत्कृष्टपणे पार पडले.

भक्तांच्या मते, ही दिंडी यात्रा केवळ प्रवास नसून आत्मशुद्धी आणि श्रद्धेचा अनोखा सोहळा आहे. “प्रत्येक पावलागणिक दगाजी महाराजांची आठवण आणि नर्मदेची ओढ जाणवत होती,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

३३ वर्षांची परंपरा जपणारी ही दिंडी यात्रा यंदाही भक्तांच्या मनात श्रद्धा, एकता आणि अध्यात्माची ज्योत प्रज्वलित करून गेली.

नंदुरबारचे आमदार डॉ. विजयकुमार गावित हे आजारी होते त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले.धमडाई ता. नंदुरबार येथील आमदारांचे डॉ. विजयकुमार गावित यांचे कार्यकर्ते रवी वेंकटराव पाटील यांनी दगाजी महाराज यांच्याकडे नवस केला जर डॉक्टर गावित यांची तब्येत चांगली झाली तर दिंडीत सहभाग सहभागी होऊ, त्याप्रमाणे डॉक्टरांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने ते या दिंडीत सहभागी होऊन त्यांनी नवस फेडला.

दहा वर्षापासून ट्रॅक्टर सेवा देत आहे. यात दिंडीत सहभागी भाविकांचे सामान घेऊन शेवटपर्यंत ट्रॅक्टरने पोचवतात त्यांचे आजोबा नारायण मेघजी पटेल यांच्या पासून कुटुंबातील सदस्य या दिंडीत सहभागी होत आहेत. आमची परिस्थिती बेताची होती मात्र आता सुबत्ता  आली आहे आम्ही कोणतेही नवस वगैरे केलेला नाही मात्र या दिंडीत सहभागी झाल्यानेच माझ्या कुटुंबाची प्रगती होत आहे. या भावनेपासूनच आम्ही  तीन पिढीपासून अविरत या दिंडीत सहभागी होत आहे.
कल्पेश पटेल, निंभोरा, गुजरात.

बातमी शेअर करा
Previous Post

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026
नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना मिळणार अधिकृत परवाने

नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना मिळणार अधिकृत परवाने

April 2, 2026
नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना  रद्द, ६ निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

April 1, 2026
होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

April 1, 2026
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

April 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add