नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील खोडसगाव येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेना पक्षाचा गमछा प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या झालेल्या पक्ष प्रवेशामुळे या भागात शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचे सांगण्यात आले.
शिवसेना भवन,आमदार कार्यालयात पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टीचे खोडसगाव गटप्रमुख किशोर पाटील यांच्यासह पोपट विठ्ठल पाटिल,छोटुलाल छगन पाटिल, प्रल्हाद नारायण पाटिल,बिजलाल नारायण पाटिल, गोविंद मक्कन पाटिल, शंकर पाटिल, विश्वनाथ पाटिल, एकनाथ पाटिल,जगन पाटिल, डॉ.राजेंद्र पाटिल, डॉ.महेंद्र पाटिल, दिलीप पाटिल, विजय पाटिल, जिवन पाटिल, संदिप पाटिल, ज्ञानदेव पाटिल, तुषार पाटिल यांनी शिवसेनेचा शिंदे गटात प्रवेश केला.
यावेळी आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, खोडसगाव येथील भाजपचा पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेवर मोठा विश्वास दाखवलेला आहे. या परिसरातील नागरिकांच्या समस्या त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना ज्या काही अडचणी येत असतील त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू. यावेळी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक रविंद्र पवार, नगरसेवक प्रतिनिधी शितल पटेल आदी उपस्थित होते.








