नंदुरबार l प्रतिनिधी
आ.चंद्रकांत रघुवंशी यांचा विशेष प्रयत्नातून त्यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून जिल्ह्यातील 3 दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकलींचे वाटप करण्यात आले. यापूर्वी देखील सायकलींचे वाटप झाले करण्यात आले होते.
या उपक्रमामुळे दिव्यांगांना प्रवासासाठी हक्काचे साधन मिळाले असून त्यांनाही आत्मनिर्भरतेचा प्रवासात मोठी मदत होणार आहे.
सामाजिक बांधिलकी जोपासत दिव्यांगांना सोय उपलब्ध होऊन त्यांना आधार मिळावा यासाठी आमदार निधीतून बुधवारी नगरपालिकेत शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते आकाश रायसिंग भिल,सरलाबाई आकाश भिल रा.कोरीट ता.नंदुरबार, खातिजा अब्बासी बोहरी रा. खापर ता.अक्कलकुवा यांना इलेक्ट्रिक सायकलिंकचे वाटप करण्यात आले.
यावेळी नगरसेवक किरण रघुवंशी,पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,नगरसेवक कुणाल वसावे,माजी नगरसेवक फारूक मेमन, नगरसेवक पप्पू गिरासे उपस्थित होते.







