नंदुरबार l प्रतिनिधी-
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करावे या मुख्य मागणीसह विविध मागण्या घेऊन मनरेगा कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुक्रवार दिनांक 23 जानेवारी पासून बेमुदत आंदोलन पुकारले आहे.
आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी काळ्या फीत लावून मनरेगा कंत्राटी अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने शासनाचा निषेध करण्यात आला. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद,तहसील कार्यालय,पंचायत समिती अशा विविध कार्यालयामध्ये मनरेगाचे कंत्राटी अधिकारी कर्मचारी विविध पदांवर कार्यरत आहेत इतर समकक्ष योजनांतील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याबाबत अथवा आवश्यक संरक्षण प्रदान करण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घेतले. मात्र मनरेगा योजनेच्या कर्मचाऱ्यां बाबतीत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. हे अन्यायकारक आहे मनरेगा अंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना इतर योजनेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे शासन सेवेत नियमित करावे अनधिकृत व अवैध कर्मचारी भरती रद्द करून समान काम समान वेतन धोरण लागू करावे अशा मागण्या घेऊन कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे
नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार तालुक्यातील तहसीलदार गटविकास अधिकारी यांच्या मार्फत मागण्यांचे निवेदन संघटनेचे शिष्टमंडळद्वारे शासनाला सादर करण्यात आले आहे यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांनी काळ्या फित लावून काम बंद आंदोलन केले या आंदोलनात एमआय समन्वयक,कार्यक्रम व्यवस्थापक,सहाय्यक कार्यक्रमाधिकारी तांत्रिक अधिकारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, सहभागी झाले होते.








