नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार येथे रविवार १८ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता हिंदु सेवा सहाय्य समिती आयोजित विराट हिंदू धर्म जागृती सभा श्रॉफ हायस्कूल मैदान येथे होणार आहे. यानिमित्ताने धर्मध्वज व भूमिपूजन पीठाधीश पू. उध्दवजी महाराज, पुरोहित संघाचे पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रचार रिक्षाचे पूजन करून प्रचारास प्रारंभ करण्यात आला.
नंदुरबार शहरात होणाऱ्या हिंदु धर्म सभेला प्रमुख वक्ते म्हणून कालिपुत्र कालीचरण महाराज हे उपस्थित राहणार आहेत. सभा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सभा स्थळ श्रॉफ हायस्कूल मैदानाचे भूमिपूजन व धर्मध्वज पूजन वैदिक जयघोषात करण्यात आले.पूजनासाठी पीठाधीश पू. उद्धव महाराज, पुरोहित संघाचे प्रमोद जोशी, बिहारी महाराज,राजु शुक्ल, गणेश पाठक, सचिन ईंदोरिया, गुरुदत्त कुळकर्णी, पंडित रविंद्र पाठक, शंकर महाराज आणि हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ नरेंद्र पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी समितीचे धर्मसेवकांनी जयतु जयतु हिंदुराष्ट्रमचा घोषणा दिल्या.
यावेळी पिठाधीश पू उध्दव महाराज यांनी हिंदु समाजाला आवाहन केले की, सभेचे वक्ते कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या प्रखर वाणीतून हिंदुत्वाची बुलंद तोफ नंदुरबार शहरात येत आहे. तरी मोठ्या संख्येने हिंदूंनी या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन केले. हिंदूंवर होणाऱ्या आघातांचा विरोधात हिंदूंना संघटीत होण्यासाठी ही सभा आयोजित केली आहे, सभेला प्रमुख वक्तेसह जिल्ह्यातील संत महंत उपस्थित राहणार आहेत. तरी हिंदूंनी धर्मकर्तव्य म्हणून सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन हिंदु सेवा सहाय्य समितीचे प्रमुख डॉ नरेंद्र पाटील यांनी केले.








