Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एकतेचा दौडने लोहपुरुषांना नंदुरबारकरांचा सलाम

team by team
November 1, 2025
in राष्ट्रीय
0
एकतेचा दौडने लोहपुरुषांना नंदुरबारकरांचा सलाम

एकतेचा दौडने लोहपुरुषांना नंदुरबारकरांचा सलाम

नंदुरबार l प्रतिनिधी-

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त नंदुरबार शहरात पोलीस विभागाच्या वतीने “एक भारत, श्रेष्ठ भारत” या घोषवाक्याखाली भव्य एकता दौड आयोजित करण्यात आली. या दौडीमध्ये शेकडो नागरिक, पोलीस अधिकारी-कर्मचारी, महिला, विद्यार्थी, खेळाडू तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उत्साहाने सहभागी झाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी उपस्थितांना एकतेची शपथ देत “एकता दौड”ला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अप्पर पोलीस अधीक्षक आशीष कांबळे, निवासी जिल्हाधिकारी कल्पना ठुबे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन आणि इतर अधिकारी यांच्यासह नागरिकांनी उत्साहात दौड सुरु केली.

नेहरू पुतळ्यापासून धुळे चौफुलीमार्गे परत नेहरू पुतळ्यावर संपलेल्या या दौडीत धावपटूंनी पाच किलोमीटर अंतर पार करत एकतेचा, देशभक्तीचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला. दौडीदरम्यान शहरात “भारत माता की जय”, “एक भारत-श्रेष्ठ भारत” अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले. नागरिकांनी मार्गावर उभे राहून सहभागींचे फुलांनी स्वागत केले.

दौड संपल्यानंतर शिरीषकुमार मेहता उद्यानात असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून लोहपुरुषांना अभिवादन करण्यात आले. या वेळी सहभागींच्या चेहऱ्यावर देशप्रेम आणि अभिमान झळकत होता. दौड पूर्ण केलेल्या पहिल्या पाच पुरुष व महिला स्पर्धकांना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी केवळ नऊ वर्षांचा कार्तीक खेडकर या बालधावपटूने सहभागी होऊन सर्वांची मने जिंकली. त्याला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.

या उपक्रमात वयोवृद्ध नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी, तसेच पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी यांचा मोठा सहभाग राहिला. संपूर्ण शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. सकाळच्या थंडगार वातावरणात नागरिकांनी राष्ट्रीय एकता दिन साजरा करत देशभक्तीचा नारा दिला. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध ठिकाणी अशाच प्रकारे एकता दौड आयोजित करण्यात आली. या माध्यमातून सरदार पटेल यांच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारांना अभिव्यक्ती देत समाजात एकजुटीचा आणि राष्ट्रीय अभिमानाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

बातमी शेअर करा
Previous Post

धडगावचा शेतकऱ्यांचा आक्रोश,मुसळधार पावसाने पिके वाहून गेली; उगवलेली कणीसे कुजली, दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी

Next Post

नंदुरबार शहर भारतीय जनता पार्टीतर्फे लोहपुरुष सरदार पटेल जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post
नंदुरबार शहर भारतीय जनता पार्टीतर्फे  लोहपुरुष सरदार पटेल जयंतीनिमित्त अभिवादन

नंदुरबार शहर भारतीय जनता पार्टीतर्फे लोहपुरुष सरदार पटेल जयंतीनिमित्त अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026
मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

February 18, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 18, 2026
लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add