नंदुरबार l प्रतिनिधी
14 सप्टेंबर हिंदी दिवसानिमित्ताने मिशन हायस्कूल येथे हिंदी दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी संगीता रघुवंशी होत्या, शाळेचा प्राचार्य नूतनवर्षां वळवी यांच्या हस्ते संगीता रघुवंशी यांचे लहान रोपटे देऊन स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते सर्व हिंदी शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान केला. हिंदी विषय विभाग प्रमुख वंदना जांबिलसा यांनी हिंदी दिवसाची प्रस्तावना केली.संगीता रघुवंशी यांनी आपल्या मनोगतामध्ये इंग्रजी भाषेतील स्पेलिंगांचे उच्चार कसे वेगळे होतात मात्र बोलले वेगळे जातात याउलट हिंदी भाषेत शब्दांचे जे उच्चार होतील तेच बोलले जातील, यावेळी इंग्रजीमधील विविध स्पेलिंगांचा उच्चारांचेही ही दाखले विद्यार्थ्यांना देण्यात आले.
दुर्गेश पवार याने हरिवंशराय बच्चन यांची “अग्निपथ” कविता विद्यार्थ्यांसमोर अतिशय सुरेख रित्या मांडली, इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी रिद्दीमाने “कोशिश करने वालो की कभी हार नही होती “जानवी मिश्रा, प्रिया शेलार या विद्यार्थिनींनी संत कबीर यांचे दोहे अर्थासहित स्पष्ट केले. मनीष पाडवी यांनी हिंदी भाषेचे न ऐकलेले शब्द लोहपदगामिनी, अधिकोष, सचल, सचलं दूरभाष यंत्र,मुद्रक,शब्दकोश क्रिकेट यांच्यासारख्या शब्दांचे अर्थ विद्यार्थ्यांना विचारले.इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींचा समूहाने हिंदी कवितेवर नृत्य सादर केले.
यावेळी हिंदी भाषेचे महत्व विशद करणारी रेल्वे गाडी तयार करण्यात आली. नववीचा विद्यार्थी चिराग पाडवी याने “डाकिया डाक लाया” या गाण्यावर पोस्टमनचे अभिनय उत्तम रित्या सादर केले यावेळी विद्यार्थ्यांना विविध “पहेलिया” विचारण्यात आल्या यावेळी विद्यार्थ्यांनी उत्तमरीत्या या पहेल्यांची उत्तरे दिली, उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळेस प्रोत्साहन म्हणून मान्यवरांच्या हस्ते पेन्सिल बक्षीस म्हणून देण्यात आल्या. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष पाडवी यांनी केले तर आभार प्रदर्शन अरुण गर्गे यांनी मानले कार्यक्रमासाठी रुचिता सुतार, जयश्री कदम चेतना सोनेरी, रोझलीन यंगड, स्नेहलता मोरे, दिनेश ठाकरे तसेच सर्व हिंदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.