नंदुरबार l प्रतिनिधी
एस.ए. मिशन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज नंदुरबार या शाळेच्या २००३ च्या इयत्ता १० च्या वर्गाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलनाचे शाळेत आयोजन करण्यात आले होते.
संमेलनाच्या प्रमुख पाहुणे म्हणून एस.ए. मिनिस्ट्रीज ट्रस्ट च्या अध्यक्षा मिस. मार्था सुतार उपाध्यक्ष हर्षानंद कालू एस.ए. मिशन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज नंदुरबार च्या प्राचार्या सौ. नूतनवर्षा आर वळवी, एस.ए. मिशन प्राथमिक शाळा नंदुरबार च्या मुख्याध्यापिका श्रीम. सुषमा पाडवी उपमुख्याध्यापक विजय पवार हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या सौ. नूतनवर्षा आर वळवी होत्या. कार्यक्रमास सर्व आजी माजी वर्गशिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते. अध्यक्षीय भाषणात सौ. नूतनवर्षा आर वळवी यांनी मार्गदर्शन केले सद्यस्थितीत शाळेने कशी मोठी उंच भरारी घेऊन राज्यात व विभागात शाळेने विविध पुरस्कार व बक्षिसे मिळवलीत याबद्दल आलेल्या माजी विद्यार्थ्यांना सांगितले आपल्या शाळेत शिकून गेलेले विद्यार्थी हे आज विविध क्षेत्रात व्यवसायात उच्च पदावर आहेत आपण घडवलेल्या विद्यार्थ्यांची प्रगती पाहून त्यांनी आनंद व्यक्त करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
उपस्थित आजी माजी शिक्षकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांकडून उपस्थित शिक्षकांचा भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित माझी विद्यार्थ्यांनीहि अश्रूपूर्ण नेत्रांनी आपले मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
सुरुची भोजन झाल्यानंतर गेट टुगेदर कार्यक्रमात दिवसभरात विविध मनोरंजन कार्यक्रम, खेळ, आणि गप्पा-गोष्टींचे आयोजन करण्यात आले होते. आभारप्रदर्शना नंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या परवानगीने स्नेहसंमेलनाचा समारोप करण्यात आला.