नंदुरबार l प्रतिनिधी-
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण यातील भाजपा उमेदवारांच्या पूर्वतयारीच्या संदर्भाने माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ.विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक बैठक पार पडली. दरम्यान, या बैठकी प्रसंगी अक्कलकुवा तालुक्यातील काँग्रेस आणि शिंदे गटाच्या शिवसेनेतील शेकडो जणांनी डॉ. विजयकुमार गावित यांच्या विकास कार्यावर विश्वास दर्शवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
या बैठकीला संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, अक्कलकुवा धडगाव विधानसभा प्रमुख नागेश पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य नितेश वळवी, माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे, अशोक दादा, रायसिंग दादा, रोशन दादा,मनोज दादा, दाब सरपंच आकाश वसावे,धनसिंग वसावे यांच्यासह अक्कलकुवा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी विविध गावाचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अक्कलकुवा तालुक्यातील पाच गटांची प्रमुखांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी आणि योजना दिल्या जातात परंतु पाड्यापर्यंत पोहोचून विकास होणं महत्त्वाचे असते. तुमच्या आमच्या सारख्या लोकप्रतिनिधींचा ते कर्तव्य आहे. म्हणून गाव पाड्यातील प्रत्येकाने जागृत आणि संघटित व्हावे आणि येणाऱ्या निवडणुकीत आपली शक्ती दाखवून द्यावी; असे आवाहन याप्रसंगी माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले. माजी खासदार संसद रत्न डॉक्टर हिना गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, ज्यांना तांत्रिक माहिती नाही आणि कायदे नियमांचे देखील भान नाही अशा लोकांना मत देऊन निवडून देणे आता थांबवले पाहिजे. आपल्या गावातील प्रश्न खरोखर कोण सोडवून देईल हे लक्षात घेऊन परिवर्तन घडवायला सिद्ध व्हा; असेही आवाहन त्यांनी भाषणातून केले.
दरम्यान, आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या विकासात्मक कार्यशैलीवर विश्वास दर्शवित भाजपा कार्यालय अक्कलकुवा येथे काँग्रेस पक्षाच्या आणि शिवसेना शिंदे गटाच्या अक्कलकुवा तालुक्यातील हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी माजी खासदार डॉक्टर हिना गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित अक्कलकुवा धडगाव विधानसभा प्रमुख नागेश पाडवी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील माजी तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्यासह अक्कलकुवा तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.