नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खुर्द येथील शाळांमध्ये आ. डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त उपसरपंच सागर साळुंखे यांच्या तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
माजी आदिवासी विकास मंत्री आता विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्लिश स्कूल तसेच न्यू इंग्लिश स्कूल येथील विद्यार्थ्यांना गावाचे माजी उपसरपंच सागर साळुंखे यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जितेंद्र सुदाम मराठे, सागर रमेश साळुंखे, मल्हारी पाटील ,जितेंद्र बोरसे, दिगंबर कदमबांडे व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.