नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील दहिंदुले येथे एकलव्य आदिवासी क्रांती दल संघटना व विजू दादा मित्र परिवारातर्फे जागतिक आदिवासी दिवस जल्लोषात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
सालाबादप्रमाणे जागतिक आदिवासी दिवसानिमित्त दहिंदुले गावात एकलव्य आदिवासी क्रांतिदल संघटना व विजू दादा मित्र परिवार तर्फे जल्लोषात कार्यक्रम करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी महापुरुष प्रतिमा पूजन गावातील वरिष्ठ व मान्यवराच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दीपक मराठी, माजी जि.प.सदस्य अमोल भारती, माजी नगरसेवक रवींद्र पवार, प्रफुल खैरनार, राजाराम पटेल यांच्यासह गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
कोळदा गटातील सर्व वरिष्ठ मान्यवर यांच्या सत्कार दहिंदुले गावातील सरपंच विजय पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.