नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित अनुदानित आश्रम शाळा कोळदा येथे विश्व आदिवासी गौरव दिनानिमित आयोजित विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले. गावातून रॅली काढत आदिवासी क्रांतिकारकांना नमन करण्यात आले तर वीर एकलव्य यांच्या पुतळ्याला प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.दरम्यान,विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर पारंपरिक पेहराव करून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले.
आश्रमशाळेत आयोजित कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर कोळदे येथील माजी सरपंच जिजाबाई पाडवी, भरत पटेल, पालक,प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी, मुख्याध्यापक आय.एन.चौधरी उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी दर्जेदार कलाविष्कार सादर करत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. यावेळी आदिवासी संस्कृती आदर्श असल्याचे सांगत प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी म्हणाले की, विश्व आदिवासी गौरव दिवस साजरा होत असल्याने गौरवास्पद आहे.असंख्य आदिवासी महानायकांचा स्वातंत्र्य लढ्यात सिंहाचा वाटा आहे. जल,जंगल आणि जमिनीवर ज्यांचा मूळ हक्क असे आदिवासी असल्याचे सांगितले. दरम्यान,भगवान बिरसा मुंडा,क्रांतिकारी ख्वाजा नाईक यांच्या कार्याला उजाळा दिला.विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी संघटित होऊन आणखी प्रयत्न करावे लागतील.आजच्या विद्यार्थ्यांमधून समाजाचे नेतृत्व घडावे,अशी अपेक्षा प्राचार्य रघुवंशी यांनी व्यक्त केली.
सदर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे चेअरमन चंद्रकांत रघुवंशी, व्हा. चेअरमन मनोज रघुवंशी व सर्व संचालक तसेच कार्यालय अधीक्षक पुष्पेंद्र रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्राचार्य शैलेंद्र एस.रघुवंशी व मुख्याध्यापक आय. एन. चौधरी यांच्यासह निलेश पाटील, राकेश पाटील, विनोद कुंभार,वसंत भोये, प्रफुल्ल चौधरी, मनिषा गावित, भावना जाधव, चेतना पाटील, जयश्री साळुंखे, भारती भामरे,हेमराज पाटील, शुभम परदेशी, भूषण शिंदे,ललित माळी, पंडित कोकणी, सुरेंद्र पवार, स्वप्नील सामुद्रे, संदीप पाटील, राजू अहिरे, दिनेश मराठे, आर.आर.शेख उपस्थित होते.यशस्वितेसाठी नंदकिशोर पाठक व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन व आभार ललित माळी यांनी मानले.
निबंध स्पर्धेला प्रतिसाद
आदिवासी विकास विभागाच्या सूचनेप्रमाणे इयत्ता आठवीच्या वर्गात निबंध स्पर्धा घेण्यात आली.यात सहभागी होत विद्यार्थ्यांनी यास प्रतिसाद दिला.
हातावर राखी अन् चिमुकले भारावले
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना रक्षाबंधन सणानिमित रोटरी क्लबतर्फे राखी वाटप करण्यात आल्या. विद्यार्थिनींनी आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या.यावेळी चिमुकले भारावून गेले होते.सदर कार्यक्रमासाठी रो.विवेक जैन,राहुल पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत कोटेचा, राजेश्वर चौधरी उपस्थित होते.