नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील का. वी. प्र. संस्था भालेर , संचलित श्रीमती क.पू पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूल येथे विश्व आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, सचिव भिका पाटील, ज्येष्ठ नागरिक बी. के.पाटील ,भालेरच्या सरपंच प्रा.सौ. कविता पाटील, तिसीचे ॲड . राहुल पाटील, उपसरपंच रतन भिल, मुख्याध्यापक पी. एस. सुर्यवंशी, जाण्याभाऊ भिल, शिवदास भिल ,नगाव,तिशी, भालेर,येथील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे प्रतिमापूजन उपसरपंच रतन भिल व जाण्याभाऊ भील यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले. विद्यालयातील छात्रालयाच्या विद्यार्थिनींनी आदिवासी नृत्य सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. व्ही. इशी यांनी केले व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.