नंदुरबार l प्रतिनिधी
के.डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय पथराई येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे कलापथक, याचबरोबर भगवान बिरसा मुंडा, तंट्यामामा भिल, आणि ख्वाजा नाईक यांच्या जिवंत देखाव्यासह सर्वप्रथम मिरवणूक काढण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी आदिवासी गीतांवर नृत्य सादर केले.
त्यानंतर आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्रकुमार गावित हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी युवक क्रीडा कल्याण मंडळ, नटा वदच्या सचिव डॉ.विभूती गावित, व आदिवासी देव मोगरा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव ऋषिकाताई गावित ह्या होत्या.
सर्वप्रथम देवमोगरा माता तसेच आदिवासी क्रांतिवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर के.डी. गावित सैनिकी विद्यालयाचा व के.डी. गावित इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बोलीभाषेत मनोगत व्यक्त केले. व आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे नृत्य सादर केले.
प्रमुख अतिथी डॉ.विभूती गावित यांनी “आदिवासी समाजाची संस्कृती ही महान असून ती आपण जपली पाहिजे. आर्थिकदृष्ट्या कमतरता असली तरी वैचारिक दृष्ट्या आपण खूप पुढे आहोत. असे मत मांडले.
प्रमुख अतिथी ऋषीका गावित यांनी आदिवासी भाषेत भाषणाला सुरुवात करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. “येणाऱ्या काळात आदिवासी समाजाला पुढे नेण्यासाठी शिक्षणाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे आणि हेच कार्य आपण संस्थेच्या माध्यमातून करत राहणार आहोत असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आदिवासी जननायकांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून मोठे होण्याचा प्रयत्न केला पाहिजे तसेच प्रामाणिकपणे काम केल्यास परिश्रम घेतल्यास समाज नक्कीच आपल्यास नेहमी लक्षात ठेवेल यात शंका नाही. ”
असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी मांडले.
याप्रसंगी नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती.प्रियांका गावित, के. डी.गावित इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य एलिस सर,के.डी.गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शरद बागुल, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रजनी करेले यांनी तर आभार महैंद्र बांगर यांनी मानले.
सदर कार्यक्रमासाठी संदीप ईशी , सुरेश पाडवी व श्रीमती संगीता वळवी, काशिनाथ सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.