नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील कात्री येथील चार कुपोषित मुलांना आदिवासी दिनाच्या निमित्ताने दत्तक घेत. आगळ्या वेगळ्या पद्धतीने आदिवासी गौरव दिन साजरा केल्याचे समाधान व्यक्त करीत. आपण समाजाचे देणे लागतो. आपल्या परीने जेवढी शक्य होईल तेवढी मदत करण्याच्या हेतूने डॉ. विक्रांत मोरे यांनी सांगितले.
धडगाव तालुक्यातील कात्री येथील सोलखेडीपाडा अंगणवाडी केंद्रात नंदुरबार येथील डॉ.विक्रांत मोरे मित्र परिवाराच्या वतीने 9 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवसाचे औचित्य साधून सोलखेडीपाडा अंगणवाडी केंद्रातील कुपोषणग्रस्त चार बालके दत्तक घेऊन त्यांना कुपोषण मुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला. या चार मुलांच्या कुपोषण मुक्तीसाठी सहा महिन्याच्या पौष्टिक असा आहार व त्यासाठी लागणारे इतर साहित्या चा पुरवठा यावेळी करण्यात आला.
समाजापुढे आदर्श निर्माण होईल असा संवेदनशील प्रेरणादायी स्तुत्य उपक्रम अतिदुर्गम भागात राबविण्यात आला.
सोलखेडीपाडा अंगणवाडी केंद्र येथे जिजामाता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विक्रांत मोरे यांच्या हस्ते माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रवीण गुरव, रिपाई युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील ,ॲड.प्रवीण वाघ, आदिवासी क्रांतीदला चे प्रकाश गावित, अंकुश नाईक, प्रफुल पाटील पोलीस पाटील फत्तेसिंग वळवी, ठोग्या वळवी, कालसिंग वळवी, भीमसिंग वळवी, संदीप वळवी, अंगणवाडी सेविका बिंदिया वळवी, आशा सेविका भारती वळवी, राजीबाई वळवी, रमेश वळवी, धीरसिंग वळवी, भिका वळवी, ग्रामस्थांसह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान
१)अच्छिंद्र कृष्णा वळवी वय
(2 वर्ष 8 महिने) राहणार सोलखेडीपाडा ,
२)कृतिका कृष्णा वळवी वय (4वर्षे 6 महिने) राहणार सोलखेडीपाडा,
३) शुभम चमाऱ्या वळवी (4 वर्षे)
राहणार सोलखेडीपाडा,
४)आर्यन अमरसिंग वळवी (2 वर्षे)
राहणार सोलखेडीपाडा
या बालकांना दत्तक घेण्यात आले सदर बालकांच्या पालकांकडून डॉ. विक्रांत मोरे यांनी आस्तेवाईकपणे विचारपूस करून माहिती जाणून घेतली. येथेच अंगणवाडी सेविका आशा सेविका , पालक तथा ग्रामस्थांच्या उपस्थितीत पोषण आहार किट श्री विक्रांत मोरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या.
सदर बालकांना किमान सहा महिन्यातच कुपोषण मुक्त करण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
आभार अंगणवाडी सेविका श्रीमती बिंदिया वळवी यांनी मानले त्यांनी सांगितले की, अतिदुर्गम भागातील आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या वंचित असलेल्या परिवारातील बालकांना विक्रांत मोरे यांनी 9 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवसानिमित्त कुपोषण मुक्तीसाठी दत्तक घेऊन समाजापुढे एक संवेदनशील व प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे त्याबद्दल आम्ही सर्व सोलखेडीपाडा येथील ग्रामस्थ त्यांचे मनस्वी आभारी आहोत.