नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर शहरातील व दयेच्या ठिकाणी एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस त्या ठिकाणी पोचल्याने चोरटे पसार झाले होते. पोलिसांनी बारा तासाच्या आत याप्रकरणी संशयित सहा चोरट्यांना अटक केली आहे.
दि.7 ऑगस्ट 2025 रोजी रात्री नवापुर पोलीस ठाण्यातील रात्रगस्त अंमलदार हे सतर्कपणे नवापुर शहरात गस्त घालत असतांना शहरातील महात्मा गांधी पुतळयाचे जवळ आले असता तेथे जवळच एका ATM मधुन काही इसम हे संशयितरित्या पळत असतांना दिसुन आले. सदरवेळी रात्रगस्त घालणाऱ्या अंमलदारांनी त्याचा पाठलाग केला परंतु संशयित इसम हे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. रात्रगस्त अंमलदार यांनी त्यानंतर लागलीच घटनास्थळावरील ATM ची पाहणी करता ATM मशीन हे खाली पडलेले दिसुन आले. पळालेल्या संशयित इसमांनी ATM मशीन हे तोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रथमदर्शनी दिसुन आले. त्याअन्वये एसबीआयचे नावापुर शाखाधिकारी अतुल प्रल्हादराव देबाजे यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात भा.न्या. संहिता कलम 303(2), 334(1), 62 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास सुरु असतांना नवापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा उच्छल, गुजरात येथील सुमितभाई गामीत, जस्टीनकुमार गामीत, जतीन मोना गामीत व त्यांचे साथीदार अशांनी केला आहे, अशी खात्रिशीर माहिती मिळालेवरुन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी लागलीच पथकास उच्छल, गुजरात येथे बातमीची खात्री करुन कारवाई कामी रवाना केले.
नवापुर पोलीस पथकाने मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे उच्छल, गुजरात येथे जाऊन संशयित इसमांचा शोध घेतला असता ते गावात मिळुन आले. त्यांना त्यांचे व सोबतचे साथीदारांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नावे सुमितभाई दानियलभाई गामीत, जस्टीनकुमार दिलीपभाई गामीत दोन्ही रा. भिंत खुर्द, ता.उच्छल, जि. तापी, राज्य गुजरात गणेशभाई जिवन गामीत दोन्ही रा. रावजीबुधा, ता. उच्छल, जि.तापी, राज्य गुजरात तसेच दोन विधी संघर्ष बालकांना अटक केली.
अधिकची विचारपूस करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबूली दिली. तसेच गुन्हा करतेवेळी वापरण्यात आलेली हत्यारे सह दोन मोटारसायकली असा मुद्देमाल जप्त करण्यात देखील पोलीसांना यश मिळाले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, नंदूरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली नवापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, जितेंद्र महाजन, भाऊसाहेब लांडगे, पोहेकॉ/किशोर वळवी, राजधर जगदाळे, मोहन शिरसाठ, दिनेशकुमार वसुले, पोना/सुरेंद्र पवार, पोशि/किशोर वळवी, अतुल पानपाटील, दिनकर चव्हाण, रविंद्र भोई, समाधान केंद्रे, अमृत पाटील, नेहरु कोकणी, प्रमोद गुजर, प्रकाश कोकणी, फॉरेन्सिक तज्ञ स्वप्नील वाळके, संजय रामोळे, पुरुषोत्तम साठे यांनी केली आहे.