नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य महाराजस्व अभियान अंतर्गत महसूल सप्ताह अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडाळी गावात राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम व आरोग्य सभापती हेमलता शितोळे पाटील, सरपंच जयाबाई ठाकरे, उपसरपंच अभय गोसावी,
माजी सरपंच दीपक पाटील, तहसीलदार दीपक गिरासे,तालुका कृषी अधिकारी के एस वसावे, मंडळ अधिकारी गजानन पवार,ग्राम महसूल अधिकारी जिजाबराव पाटील, ग्रामविकास अधिकारी भगवान देसले परिसरातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आदी उपस्थित होते.