नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील राजापूर जवळील पुलाचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले
नंदुरबार तालुक्यातील राजापूर गावात शिवण नदी ओलांडून जाण्यासाठी पुलाची नितांत गरज होती. ग्रामस्थांची ही गरज ओळखून राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी आदिवासी विकास मंत्री असताना गावाला हा पूल मंजूर करून दिला होता. ३.५० कोटी रुपये खर्च करून या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील, माजी तालुकाध्यक्ष जे.एन पाटील, वैंदाने गावाचे उपसरपंच डॉ मनोज गिरासे, राजापूर गावचे माजी सरपंच भोला ठाकरे, माजी उपसरपंच उद्धव वंजारी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तसेच राजापूर गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. पुलाच्या उद्घाटनानंतर आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. येणाऱ्या पाच वर्षात या संपूर्ण समस्यांचे निराकरण करणार असल्याचं माहिती ग्रामस्थांना आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी दिली.