नंदुरबार l प्रतिनिधी-
1 ऑगस्ट ते 7ऑगस्ट महसूल सप्ताह निमित्ताने नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी,कोरीट, धानोरा, आष्टे, रनाळा,नंदुरबार मांडळ या महसूल मंडळात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
नंदुरबार तालुक्यातील कोरीट, मालपूर, वाघाळे, उमर्दे खुर्द, आराळे, नंदुरबार, वैदाणे आदी गावांना कार्यक्रम घेणेत आले. त्यात सरपंच, जेष्ठ नागरिक, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच महसूल विभागातील ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी,महसूल सेवक उपस्थित होते.
या शिबिरा अंतर्गत खालील दाखले वाटप करणेत आले.
उत्त्पन्न दाखले संख्या -447
मृत्यू दाखले -368
ग्रामपंचायत रहिवासी दाखले –235 डोमिसाईल सर्टिफिकेट –432
कास्ट सर्टिफिकेट -158
सात बारा- 559
फेरफार नोंदी -389
८ अ -443
विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांचे घर भेटी करून आधार प्रमाणीकरण करण्यात आले -89
विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचा शोध घेणेत आला त्यात विशेष सहाय्य योजनेसाठी अर्ज भरून घेनेत आले. तसेच शिव व पाणंद रस्त्याचेअतिक्रमण काढणेत आले व रस्त्याच्या दूतर्फा झाडे लावणेत आली.विविध उपक्रम या महसूल सप्ताहात नंदुरबार तालुक्यातील मंडळात राबविण्यात आला.