नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीच्या वतीने नंदुरबार जिल्ह्याचे लाडके नेते, नंदुरबार जिल्हा निर्मितीचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 10 ऑगस्ट 2025 पासून सलग चार दिवस विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा निर्मितीनंतरच्या 26 वर्षात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा घेण्यात आल्या असून विजेत्यांना मोठ्या प्रमाणात पारितोषिके देण्यात येणार आहेत. व्हॉलीबॉल स्पर्धा सोडुन बाकी सर्व स्पर्धा फक्त नंदुरबार जिल्हयातील क्रीडापटूंसाठी राहतील तरी वेळेत विनामूल्य नाव नोंदणी करून जिल्ह्यातील क्रीडा प्रेमींनी या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या माजी खासदार संसद रत्न डॉक्टर हिनागावित, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावीत आणि आयोजन समितीचे प्रमुख ईश्वर धामणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
नंदुरबार जिल्ह्याच्या माजी खासदार संसद रत्न डॉक्टर हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त एक महिन्यापूर्वीच विविध क्रीडा प्रकारांचा समावेश असलेली आणि कला गुण प्रदर्शनाचा समावेश असलेली जम्बो स्पर्धा विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीने पार पडली होती आणि धुळे नंदुरबार जिल्ह्यातील क्रीडा आणि कला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्याच प्रकारे आता देखील जम्बो स्वरूपात स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
दरम्यान पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, विविध क्रीडा प्रकारातील या स्पर्धांमध्ये विजयी होणाऱ्या 155 खेळाडूंना ट्राफी, प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सहभागी होणाऱ्या 1000 हून अधिक क्रीडापटूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याचबरोबर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी निबंध स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे. यात इयत्ता नववी ते बारावी वर्गातील विद्यार्थ्यांसाठीः
1. डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात घडलेला जिल्हा विकास
2. माझा जिल्हा आणि डॉक्टर विजयकुमार गावित यांचे योगदान
3. जिल्हा निर्मितीचे शिल्पकार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यामुळे झालेला रस्ते विकास, जल नियोजन आणि आरोग्य विकास
असे विषय देण्यात आले आहेत. तर वरिष्ठ महाविद्यालय पासून पुढील क्याचा खुला गट यांच्यासाठी:
1 . डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या विकास कार्यामुळे आदिवासी जनजीवनात घडलेले बदल
2. डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या विकास कार्यामुळे दुर्गम भागात मिळालेल्या रोजगार सुविधा
3 . डॉक्टर विजयकुमार गावित यांनी महिला सबलीकरण व शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य
असे विषय देण्यात आले आहेत. इयत्ता नववी ते बारावी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोबाईल क्रमांक-महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी मोबाईल क्रमांक- प्रा. डॉ. पंडीत सर-7745890294
*खेळाचा तपशील व नोंदणीसाठी क्रमांक*
दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी रोप स्किपिंग स्पर्धा वय वर्षे 10,14,17 वयाच्या आतील गटासाठी आणि अठरा वर्षावरील खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक क्रीडापटूंनी 9 ऑगस्ट पर्यंत धनराज अहिरे मोबाईल क्रमांक 8888440729 यांच्याकडे नोंदणी करावयाची आहे.
दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी कॅरम स्पर्धा अठरा वर्षांहून अधिक वयाच्या खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली असून नाव नोंदणी 9 ऑगस्ट पर्यंत जगदीश बच्छाव मोबाईल क्रमांक 9921290312 यांच्याकडे करावयाची आहे.
दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 12 14 आणि 19 वर्षे आतील वयोगटाच्या खेळाडूंचा स्वतंत्र गट आणि आंतराष्ट्रीय मानांकन प्राप्त रेटेड खेळाडुसह 19 वर्षावरील खेळाडूंचा दुसरा गट अशा चार गटात स्पर्धक भाग घेऊ शकतात. बुद्धिबळाच्या इच्छुक स्पर्धकांनी 10 ऑगस्ट पर्यंत शोभराज खोंडे मोबाईल क्रमांक 8484840974 यांच्याकडे नाव नोंदणी करावयाची आहे.
दिनांक 12 ऑगस्ट आणि 13 ऑगस्ट 2025 रोजी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील संघांसाठी हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 17 वयोगटाच्या आतील खेळाडूंसाठी पासिंग आणि 19 वर्षावरील खेळाडूंसाठी शूटिंग स्पर्धा राहील. इच्छुक स्पर्धकांनी 10 ऑगस्ट पर्यंत योगेश निकुंभ मोबाईल क्रमांक 9764227116 यांच्याकडे नाव नोंदणी करावयाची आहे.
दि. 14 ऑगस्ट 2025 बार गुरुवार रोजी सकाळी 07 वाजता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी करण्यात आले आहे. गावित यांच्या खोडाई माता रोडवरील निवास स्थाना पासून मॅरेथॉन ला सुरुवात होऊन यशवंत विद्यालय जी. टी. पाटील महाविद्यालय रोड अंधारे चौक राणाप्रताप पुतळा बस स्टॅण्ड – नेहरु पुतळा गांधी पुतळा उड्डाण पुल गिरीविहार गेट स्वागत पेट्रोलपंप करण चौफुलीपाटोदा गाव सप्तश्रृंगी मंदिरापर्यंत परत त्याच मार्गे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांचे निवासस्थान असा स्पर्धेचा मार्ग राहील. 18 वर्षे वरील वयोगटासाठी म्हणजे खुल्या गटासाठी ही स्पर्धा राहील. मॅरेथॉन स्पर्धेसाठी इच्छुकांनी श्री ईश्वर धामणे मोबाईल क्रमांक 94 222 85 709 यांच्याकडे दिनांक 12 ऑगस्ट पर्यंत नोंदणी करावी.
कला आणि क्रीडा क्षेत्रात आपल्या जिल्ह्याचे नाव उंचावण्यासाठी तसेच क्रीडा कौशल्याचा योग्य सन्मान होण्यासाठी जास्तीत जास्त क्रीडा रसिकांनी नाव नोंदणी करून सहभाग घ्यावा; असे आवाहन विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.