नंदुरबार l प्रतिनिधी
भालेर येथील का. वि. प्र. संस्था संचालित द फ्युचर स्टेप स्कूल येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भालेरच्या सरपंच सौ. कविता चंद्रशेखर पाटील होत्या. प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती क. पु. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापक उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित भाषणे सादर केली. इयत्ता सिनियर केजीपासून चौथी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल पाटील , तर आभार प्रदर्शन उमेश सोनवणे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी द फ्युचर स्टेप स्कूल भालेर येथील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.