नंदुरबार l प्रतिनिधी
महसूल विभागाची यंत्रणा ही नागरिकांचे प्रत्येक दैनंदिन महत्वाची कामे करणे, त्यांना त्यांचे दस्तावेज उपलब्ध करुन देणे, त्यांचे हक्क देणे अशा मोठ्या जबाबदारीचे कामे या विभागामार्फत पार पाडली जात असून हा म्हणजे विभाग शासनाचा चेहरा-मोहरा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले.
त्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात आयोजित महसूल दिन-सप्ताह च्या शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा (नंदुरबार) कृष्णकांत कनवारीया (शहादा) परिविक्षाधिन सनदी अधिकारी शिवांशु सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेश चौधरी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) कल्पना ठुबे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील, सर्व तहसीलदार व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी म्हणाल्या, महसूल विभागामार्फत स्थानिक लोकांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामकाजाची माहिती मिळावी यासाठी स्थानिक लोकभाषेशी जुळवून घेणे आवश्यक आहे. या विभागामार्फत होणारी सर्व कामे हे ऑनलाईन व डिजीटल करणे आवश्यक आहे. विशेषत: जमीन दस्तावेज संबंधीच्या ऑनलाईन कामांची सद्यस्थिती लोकांना कशी पाहता येईल, यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक कामांमध्ये शंभर टक्के योगदान द्यावे.
त्या पुढे म्हणाल्या, लोकांची कामे करतांना महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांच्या सेवानिवृत्तीची प्रकरणे तात्काळ निकाली काढणे, निवास व्यवस्था करणे, वैद्यकीय सुविधा देणे, कामांचे ताण-तणाव दूर करण्यासाठी उपाय करणे, निवृत्तीच्या दिवशीचीच त्यांना मिळणारे लाभ देण्याची व्यवस्था करणे अशा सुविधा देण्यावर भर देण्यात येत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महसूल दिन व सप्ताहाच्या निमित्ताने महसूल विभागातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला.
यांचा झाला गौरव..
• उपजिल्हा निवडणूक अधिकारी: प्रमोद भामरे
• तहसिलदार: दत्तात्रय जाधव
• नायब तहसिलदार: नितीन पाटील
• मंडळ अधिकारी: संतोष जाधव, समाधान पाटील
• सहायक महसूल अधिकारी: अशोक डोईफोडे, किशोर पेटकर
• ग्राम महसूल अधिकारी: नरेंद्र महाले, योगेश गावीत
• महसूल सहायक: गोपाल चौधरी, सुहास पाठक
• शिपाई: रमण चौरे, रविंद्र पेंढारकर
• महसूल सेवक: अरविंद भिल
• पोलीस पाटील: सुरेश नाईक, दीपक पाटील
यावेळी सत्कारर्थी नायब तहसिलदार (महसूल) नितीन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार नायब तहसिलदार रिनेश गावीत यांनी मानले.