नंदुरबार | प्रतिनिधी
जिल्ह्यात १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान साजऱ्या होणाऱ्या महसूल दिन व सप्ताहाच्या निमित्ताने महसूल विभागातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा १ ऑगस्ट या महसूल दिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करून गौरव केला जाणार आहे.
प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही महसूल विभागाच्या विविध सेवांमध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रामाणिक, सेवाभावी आणि परिणामकारक कार्यगतीबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. महसूल विभागाच्या कार्यक्षमतेमुळेच शासनाच्या विविध योजना आणि सेवा ग्रामीण भागात पोहचतात, हे अधोरेखित करत जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी हा सन्मान सोहळा अधिक प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
*या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा होणार सन्मान*
▪ *अपर जिल्हाधिकारी:* धनंजय गोगटे
▪ *उपजिल्हा निवडणूक अधिकारी:* प्रमोद भामरे
▪ *तहसिलदार:* दत्तात्रय जाधव
▪ *नायब तहसिलदार:* नितीन पाटील
▪ *मंडळ अधिकारी:* संतोष जाधव, समाधान पाटील
▪ *सहायक महसूल अधिकारी:* अशोक डोईफोडे, किशोर पेटकर
▪*ग्राम महसूल अधिकारी:* नरेंद्र महाले, योगेश गावीत
▪ *महसूल सहायक:* गोपाल चौधरी, सुहास पाठक
▪ *शिपाई:* रमण चौरे, रविंद्र पेंढारकर
▪ *महसूल सेवक:* मोहनसिंग ठाकरे, अरविंद भिल
▪ *पोलीस पाटील:* सुरेश नाईक, दीपक पाटील
महसूल दिन १ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता मुख्य कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात होणार असून येणाऱ्या आठवड्यात महसूल विभागामार्फत विविध जनहिताचे उपक्रम, सेवा शिबिरे आणि माहिती प्रसाराच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत विभागाची उपयुक्तता पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.