नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील कोळदा येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले आहे. नऊ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवित ते शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत
इ.५ वीच्या वर्गातून १० विद्यार्थ्यांमधून ९ पात्र झाले असून २ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत तर आठवीच्या वर्गातून अकरा विद्यार्थ्यांमधूनआठ विद्यार्थी पात्र झाले आहेत. यापैकी सात विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. पाचवीच्या विद्यार्थ्यांमध्ये अंकिता गुमानसिंग वळवी व प्रिया हिरालाल वसावे यांचा समावेश आहे तर आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये रोशन धीरसिंग वसावे, जाधव जेनती वसावे, ज्ञानेश्वर शंकर अहिरे,प्रियंका विक्रम देशमुख, नीलम मगन कोकणी, प्रियंका शांतीलाल ठाकरे, गायत्री सुरेश अहिरे यांचा समावेश आहे. यातील रोशन वसावे या विद्यार्थ्यांने जिल्ह्यात आठवा क्रमांक मिळवला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन चंद्रकांत रघुवंशी, व्ह.चेअरमन मनोज रघुवंशी व सर्व संचालक तसेच कार्यालय अधीक्षक पुष्पेंद्र रघुवंशी यांनी कौतुक केले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी, मुख्याध्यापक आय.एन.चौधरी तसेच निलेश पाटील, राकेश पाटील, विनोद कुंभार, वसंत भोये, प्रफुल्ल चौधरी, मनिषा गावित, भावना जाधव, चेतना पाटील, जयश्री साळुंखे, भारती भामरे, हेमराज पाटील, शुभम परदेशी, भूषण शिंदे, ललित माळी, पंडित कोकणी,सुरेंद्र पवार, स्वप्नील सामुद्रे, संदीप पाटील, राजू अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले.