Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सावधान : मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना नावाची कोणतीही योजना अस्तित्वात नाही,अफवांवर विश्वास ठेवू नका

team by team
July 31, 2025
in क्राईम
0
सावधान : मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना नावाची कोणतीही योजना अस्तित्वात नाही,अफवांवर विश्वास ठेवू नका

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यामध्ये ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ या नावाने सोशल मीडियावर फिरणारे संदेश (मेसेज) हे निराधार आणि चुकीचे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनोद वळवी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

या संदेशांमध्ये, 1 मार्च 2020 पासून ज्या मुलांचे दोन्ही किंवा एक पालक वारले आहेत आणि ज्यांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील दोन मुलांना ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजने’अंतर्गत प्रत्येकी रुपये 4 हजार दरमहा मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे नागरिक, पत्रकार, पालक आणि समाज कार्यकर्त्यांकडून या योजनेबाबत विचारणा केली जात आहे.

तथापि, महिला व बाल विकास विभागामार्फत ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ नावाची कोणतीही योजना सध्या राबविली जात नाही किंवा याबाबत कोणताही शासन निर्णय किंवा परिपत्रक काढण्यात आलेले नाही. त्यामुळे, नागरिकांनी सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना किंवा आमिषांना बळी पडू नये.

*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचा लाभ उपलब्ध:*
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नंदुरबार कार्यालयामार्फत 0 ते 18 वयोगटातील एकपालक बालके, अनाथ बालके, दोन्ही पालक गमावलेली बालके आणि बंदीपाल्य (कैद्यांची मुले) यासारख्या निकषांची पूर्तता करणाऱ्या बालकांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजने’चा लाभ दिला जातो. या योजनेंतर्गत पात्र बालकांना त्यांच्या वयाच्या 18 वर्षांपर्यंत दरमहा रुपये 2 हजार 250 अनुदान डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.

ज्या बालकांनी वर नमूद केलेले निकष पूर्ण केले आहेत आणि जे बाल संगोपन योजनेसाठी पात्र आहेत, अशा लाभार्थी बालकांचे पालक किंवा संबंधित व्यक्तींनी अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास विभागाशी संपर्क साधावा, असेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. वळवी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा तालुक्यातील शेकडो युवक शिवसेनेत दाखल,कन्साई,रायखेड,नांदेरखेडा, कुढावद ग्रामस्थांच्या समावेश

Next Post

येत्या निवडणुकीत शिवसेनाच मोठा पक्ष; शिवसैनिकांनी कामाला लागावे : भाऊसाहेब चौधरी

Next Post
येत्या निवडणुकीत शिवसेनाच मोठा पक्ष; शिवसैनिकांनी कामाला लागावे : भाऊसाहेब चौधरी

येत्या निवडणुकीत शिवसेनाच मोठा पक्ष; शिवसैनिकांनी कामाला लागावे : भाऊसाहेब चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add