नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचा वतीने आज प्रॉमिस डे साजरा करण्यात आला. या प्रॉमिस डे चा अर्थ असा आहे की गेल्या वर्षी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात अत्यंत कमी वजनाचे तीन बालक दाखल झाले होते आज हे बालक नऊ ते दहा महिन्याचे झाले असून एक बालक वर्षाचा झाला आहे.
जिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ञ व वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रयत्नांने हे बालक आज अत्यन्त सुदृढ आहेत.बालकांचा आज जिल्हा रुग्णालयात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. साधारणता बालकाचे वजन हे जन्मतः 2.5 किलोच्या जवळपास राहणे आवश्यक असताना या बालकांचा जन्म झाला त्यावेळी त्याचे वजन 900 ग्रॅम पेक्षा कमी होते .त्यानंतर या बालकांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तालुक्यातील रनाळा येथील अन्नपूर्णा अमोल बारी या बालिकेला 6 मे 2024 रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
यावेळी तिचं वजन 820 ग्रॅम होते या बालिकेवर 35 दिवस उपचार करून दीड किलो वजन वाढले.नंदुरबार येथील कोकणीहिल येथील शुभांगी गवळी या बालिकेचे जन्मता: वजन 980 ग्राम होते या बालिकेवर 45 दिवस उपचार केले .उपचारानंतर बालिकेचे वजन एक किलो 250 ग्रॅम ने वाढले. माळीवाडा येथील सुनिता दिनेश मराठे या बालिकेला 17 जानेवारी 2024 रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले या बालिकेवर 35 दिवस उपचार करून झाल्यानंतर एक किलो 600 ग्राम एवढं वजन वाढले .
अनुक्रमे 35 ते 40 दिवसाच्या उपचारानंतर या बालकांवर चांगले प्रकारे वजनात वाढ झाली. आज त्या बालकांना जवळपास एक वर्ष पूर्ण होत आज त्यांचे अनुक्रमे वजन अन्नपूर्णा बारी 7 किलो 320 ग्रॅम ,शुभांगी गवळी 12 किलो 50 ग्रॅम ,तर सुनिता मराठेचे वजन 7 किलो 300 ग्रॅम आहेत .
या बालकांवर जिल्हाशल्यचिकीत्सक डाॅ.कांतराव सातपुते व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नरेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग तज्ञ डॉ प्रवीण पाटील, डॉ कृष्णकुमार वळवी ,डॉ रणजीत पावरा यांच्यासह सिस्टर मोनिका बागले, वैद्यकीय अधिकारी डॉ नम्रता बोराणे, डॉ सुजाता गावित, डॉ कुमुदिनी गावित, डॉ आकाश पराडके यांनी देखरेख ठेवून उपचार केले.
आज आपले बालक अत्यंत सुदृढ असल्याने पालकांचा आनंद गगनात मावेनासा होता. त्यांनी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारीचे आभार मानले.
बालक दाखल करण्यात आले त्यावेळी बालकांचे वजन वाढावे व त्यांना पोषण मिळावे यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या एस एन सी यु अर्थात नवजात शिशुगृह येथे ठेवण्यात आले होते.यांच्यावर एस एन सी यु मध्ये विविध उपचार पद्धती करून मातांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत तसेच टेलिव्हिजन मार्फत स्थानिक भाषेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.
मातांना पोषक व सकस आहार देणे, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शकनुसार दूध पाजणे मातांनी स्वतःची निगा राखणे अश्या प्रकारे मार्गदर्शन देण्यात आले. यानुसार बालकांच्या वजनात वाढ होण्यास मदत झाली. बालकाची वेळोवेळी डोळे तपासणी ,कान तपासणी, मेंदू सोनोग्राफी, हृदय तपासणी ,शस्त्रक्रिया यासह उपचार पद्धती सुरू होत्या.
बालकांना डिस्चार्ज दिल्यानंतर सात दिवस, एक महिना, तीन महिना, सहा महिने, नऊ महिने व आज एक वर्षानंतर त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आज ते बालक अत्यंत सुदृढ असून आज त्यांचा जिल्हा रुग्णालयात पालकांसह बालकांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला व आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नरेश पाडवी, बालरोग तज्ञ डॉ प्रवीण पाटील, डॉ कृष्णकुमार वळवी, डॉ रणजीत पावरा , सिस्टर मोनिका बागले, वैद्यकीय अधिकारी डॉ नम्रता बोराणे ,डॉ सुजाता गावित डॉ कुमुदिनी गावित, डॉ आकाश पराडके व जिल्हा रुग्णालयातील सिस्टर, स्टाफ व सफाई कर्मचारी उपस्थित होते .
नंदुरबार जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या परिश्रमाने या बालकांना जीवनदान मिळाले आहे परंतु एस एन सी यु अर्थात नवजात शिशुगृह येथे बालकाच्या मानाने डॉक्टर व कर्मचारी संख्या कमी आहे. आजच्या परिस्थितीमध्ये तीन बालरोग तज्ञ , पाच वैद्यकीय अधिकारी व 23 सिस्टर येथे उपलब्ध आहे .जिल्हा रुग्णालयाच्या मागणीनुसार कर्मचारी संख्या वाढवण्यात यावी . असे सर्वसामान्य नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व कुपोषण सारखे प्रश्न पाहता ग्रामीण रुग्णालयात देखील एस एन सी यु ,नवजात अर्भक कक्ष उभारण्यात येईल जेणे करून ग्रामीण भागातील बालकांचा त्याच स्तरावर उपचार उपलब्ध होतील असे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नरेश पाडवी यांनी सांगितले.