म्हसावद । प्रतिनिधी:-
शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या मध्यमातून राहाट्यावड धरणाच्या निधीसाठी शासनस्तरावर गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू आहे. मंदाणे येथील ऐतिहासिक महत्व असलेल्या राहाट्यावड धरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना निधी मंजुरीसाठी पत्र देण्यात आलं आहे.
1985 साली या धरणाचे भूमिपूजन पार पडले होते त्यानंतर 2014 ते 2019 या कालावधीत पायाभरणीनंतर 80 टक्के काम पूर्ण झालं असून आता उर्वरित कामासाठी 10 ते 12 कोटी निधीची आवश्यकता असून,निधी उपलब्ध झाल्यास कोरडवाहू जमीन ओलिताखाली येईल आणि शेती उत्पन्नाचा दर्जा सुधारेल व याचा फायदा शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात होईल यासाठी आमदार राजेश पाडवींच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत व 10 ते 12 कोटींच्या निधी मंजुरीबाबत मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना पत्र देण्यात आलं आहे.
परिसरातील शेतकरी बांधवांना दिलेलं आश्वासन लवकरच पूर्णत्वास येणार
राहाट्यावड धरणाचा प्रलंबित प्रश्न आमदार राजेश पाडवी यांच्या पाठपुरावा आणि मागणीमुळे लवकरच मार्गी लागणार असून उर्वरित 30 टक्के काम निधी उपलब्धतेनंतर पूर्णत्वास येणार आहे. धरण क्षेत्र पाहणीनंतर शेतकऱ्यांना दिलेल आश्वासन पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर 100 टक्के प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचा हा निर्णय धरणक्षेत्रातील जमिनीला व कष्टकरी बांधवांना सुजलाम सुफलाम करणारा ठरेल यात तिळमात्र शंका नाही.