नंदुरबार l प्रतिनिधी
आयुष्यात फक्त एकच देव आहे, तो म्हणजे आपला बाप आणि एकच देवी आहे, ती म्हणजे आपली आई. आपल्या आई-बापाला आणि त्यांच्या कष्टाला समजून घेण्याची वेळ आली आहे. आपल्या एखाद्या कृत्याने आई-बापाची मान समाजात खाली जाईल असे कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन प्रा. वसंत हंकारे यांनी केले.
नंदूरबार तालुक्यातील भालेर येथील नंदुरबार तालुका विधायक समितीचे शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे “माझे आई-बाप माझा अभिमान” या विषयावर दि. ८ मार्च महिला दिनानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.वसंत हंकारे यांचेे प्रबोधन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन तिसी गावातील या विद्यालयाचे माजी विद्यार्थी गोकुळ यशवंतराव पाटील, सुधाकर हिरामण पाटील व शिवदर्शन विद्यालय यांनी संयुक्तरित्या आयोजित केला होता.
यावेळी वसंत हंकारे म्हणाले की, मुलांनो आपण आई-वडिलांना विसरत चाललो आहोत. आपले आई,बाबा, जन्मभूमी तसेच महापुरुषांबद्दल कृतज्ञ असले पाहिजे. आपण कृतज्ञता विसरत चाललोय? असा प्रश्न करत पुढे म्हणाले की या शाळेच्या चार भिंती तुम्हाला डॉक्टर,इंजिनियर, वकीलच देत नाहीत तर आम्हाला एक चारित्र्यवान माणूस देतात, माणसाची निर्मिती या शाळेच्या चार भिंतीतच होते.
मुलींना संबोधित करताना सांगितले की, आज राजमाता जिजाऊ व सावित्रीबाईंच्या समोर तुम्हाला तुमची ओळख करून देतो. खोट प्रेम करुन माती कालवू नका मुलींनो प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकून स्वतःचे आयुष्य बरबाद करु नका. आई-वडिलांची इज्जत तुमच्या हाती आहे असे सांगत
मुला-मुलींच्या आयुष्यात फक्त एकच देव आहे, तो म्हणजे आपला बाप आणि एकच देवी आहे, ती म्हणजे आपली आई. आपल्या आई-बापाला आणि त्यांच्या कष्टाला समजून घेण्याची वेळ आली आहे. आपल्या एखाद्या कृत्याने आई-बापाची मान समाजात खाली जाईल असे कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची काळजी आवाहन यावेळी त्यांनी केले.
या व्याख्यानात विद्यार्थ्यांसह पालक देखील भावूक होऊन वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाने विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थांचे अश्रू अनावर झाले. यावेळी तिन्ही गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव यशवंत पाटील लाभले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. जे पाटील यांनी केले. तर आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.एच बागुल यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी, तसेच तिन्ही गावातील नगाव,भालेर व तिसी ग्रामस्थांनी सहकार्य केलं.