नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा येथील मोहिदा शिवारात आयोजित श्री शिवमहापुराण कथेच्या कथा मंडपाचे भूमिपूजन तसेच मैदान सपाटीकरणाचा शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील यांच्या हस्ते भक्तीमय वातावरणात करण्यात आला.
मोहिदा शिवारातील नवीन तहसील कार्यालयाच्या पाठीमागे सुमारे 70 एकर जागेत श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक एक एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान मध्यप्रदेशातील शिहोर येथील पंडित प्रदीप मिश्रा श्री शिव महापुराण कथेचे निरूपण करणार आहेत या कथेचे आयोजन आमदार राजेश पाडवी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्यासह शहरातील शिवभक्तांतर्फे करण्यात आले आहे
रविवारी सकाळी श्री शिव महापुराण कथा मंडपाचे भूमिपूजन शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रघोषात मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले पाच दिवस चालणाऱ्या या कथासोहळ्यासाठी महाराष्ट्र मध्य प्रदेश व गुजरात राज्यातील लाखोंच्या संख्येने शिवभक्त उपस्थित राहणार असल्याने कथा मांडव स्थळे मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात येत आहे सुमारे 50 एकर जागेवर कथा मंडप असणार असून संपूर्ण सत्तर एकर जागेचे सपाटीकरण व सुशभीकरण करण्यात येत आहे उपस्थित भक्तां साठी भोजन व निवास व्यवस्थेसह आवश्यक सर्व सुविधांसाठी समितीतर्फे नियोजन करण्यात आले असून त्यादृष्टीने कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी उपविभागाच्या पोलिस अधीक्षक दत्ता पवार पोलीस निरीक्षक निलेश देसले शिवमहापुराण तथा समितीचे सदस्य श्याम जाधव, अजय गोयल, डॉक्टर शशिकांत वाणी, मोतीलाल जैन सागर कलाल गौरव वाणी ज्ञानेश्वर चौधरी,भाऊभाई पाटील,विनोद पाटील, समीर जैन, विनोद जैन,श्याम नायक सुनील पाटील जितेंद्र सूर्यवंशी,हिरालाल रोकडे,ईश्वर पाटील,राजेंद्र अग्रवाल,रमाशंकर माळी,प्रशात कुलकर्णी, यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी शिवभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते