नंदुरबार l प्रतिनिधी
बिना सहकार नही उद्धार हे ब्रीदवाक्य घेत महिला दिनाचे औचित्य साधून येथील सहकार भारतीच्या नंदुरबार जिल्हा शाखेतर्फे घेण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ओडिसा राज्यातून आलेले सहकार भारतीचे राष्ट्रीय कार्यालय प्रमुख लक्ष्मण पात्रा यांनी महिलांनी घरगुती 203 गृह उद्योग व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात प्रात्यक्षिकासह डेमो दाखवून महत्त्वपूर्ण माहिती दिली. पेन्शनर भवन येथे आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहकार भारतीच्या महिला जिल्हा संघटन प्रमुख सुरेखा वळवी यांनी केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. भारत मातेच्या प्रतिमेस तनुश्री बडगुजर व सुरेखा वळवी यांनी पुष्प अर्पण केले.प्रमुख अतिथी म्हणून सहकार भारतीचे नाशिक विभाग प्रमुख बन्सीलाल अंदोरे उपस्थित होते.या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष कालिदास पाठक, संघटनमंत्री महादू हिरणवाळे, जिल्हा सदस्य रोहिदास सौपुरे, यांनी केले. या प्रशिक्षण शिबिरास जळगाव जनता बँकेच्या नंदुरबार शाखेचे सहकार्य लाभले.
एक दिवसीय महिला प्रशिक्षण कार्यशाळेस धनश्री जोशी, प्रीती बडगुजर, राजश्री जावरे, नीता पवार,ज्योत्स्ना कासार, कल्पना बडगुजर, वासंती सैंदाणे,निर्मला चौधरी,मनीषा भावसार, दिपाली भावसार,करिष्मा सौपुरे, जयश्री सौपुरे, नम्रता जाधव, तसेच प्रल्हाद भावसार, बाबुलाल माळी, अरुण सोनार उपस्थित होते.तनुश्री बडगुजर हिने सूत्रसंचालन केले तर आभार सुधाकर धामणे यांनी मानले.या प्रशिक्षण कार्यशाळेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.