नवापूर ! प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील खडकी येथील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे . न्यायालयात हजर केले असता त्यास दि .५ जुलैपर्यंतची पोलीस कोठडी देण्यात आली आहे .
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार , विसरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकी येथील एका अल्पवयीन मुलीस पालकांच्या राहत्या घरुन एका युवकाने फुस लावुन पळून नेले . मुलीचे अपहत झाल्यानंतर पालकांनी शोधाशोध केली . पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली . सूत्रांच्या माहितीनुसार पोलीसांनी मुलीसह संशयितास नंदुरबार तालुक्यातील कोकणीपाडा येथून कुटुंबियांनी ताब्यात घेतले . अपहरण झालेल्या मुलीचा महिला पोलिस अंमलदार यांचे समक्ष जबाब नोंदविण्यात आला . तसेच वैद्यकीय तपासणी करून तिच्यावर अत्याचार झाल्याचा प्राथमिक अहवाल वैद्यकीय अधिकारी यांनी दिला.याप्रकरणी मुलीच्या दिलेल्या कोठडी फिर्यादीवरुन संशयि विशाल विष्णु वळवी ( रा . कोकणीपाडा , ता.जि. नंदुरबार ) याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ ( ३ ) , ३६६ ( अ ) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे . पोलीसांनी संशयितास अटक करुन न्यायालयात हजर केले असता दि .५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे . पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे करीत आहेत .