नंदुरबार l प्रतिनिधी
सिने अभिनेता अल्लू अर्जुन याचा पुष्पा चित्रपट प्रचंड गाजला.त्यात विविध कृपया शोधत सागाची तस्करी करण्यात आली होती. मात्र नंदुरबार मध्ये
पुष्पा स्टाईलवर मात देत बनावटी अंड्यांचा आडुन अवैध दारू तस्करी करताना उघड झाली आहे.पोलिसांनी शहरातून वाहनासह अवैध विदेशी मद्य असा एकुण १२ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नंदूरबार जिल्हा हा महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश या तीन राज्याचा सीमा लागून आहे.त्यामुळे बेकायदेशीर दारू तस्करी करणारे माफीया अनोखी शक्कल लढवित तस्करी करत आहेत.नंदुरबार शहरातील कोरीट रस्त्यावरील गिरीविहार कॉलनीतील एका कोपऱ्यात एक वाहन संशयास्पदरित्या उभे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने धाड टाकत सदर वाहनाची तपासणी केली. वाहनात सात लाख ८७ हजार ६८० रूपयांचे विदेशी मद्य आढळून आले. अज्ञाताने बोलेरो पिकअप वाहनास बनावट रजिस्ट्रेशन क्रमांक लावुन सदर विदेशी दारूंच्या बाटल्यांवर बनावट चिन्हांचे लेबलचा वापर केल्याचा दिसून आले. तसेच वाहनात मद्य असल्याचा संशय येवु नये, यासाठी बाहेरून प्लास्टीकच्या अंड्यांचे ट्रे ठेवण्यात आले होते. पोलिसांनी ९६ ट्रे जप्त केले आहे. तसेच ५ लाख ४० हजार रूपयांची डिलक्स व्हिस्की, दोन लाख ३३ हजार २८० रूपयांची इंम्प्रेशन्स रिजर्व व्हिस्की व पाच लाखांचे वाहन असा एकुण १२ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलिस अधिक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, पोहेकॉ.राकेश मोरे, दादाभाई मासुळ, पोना.मोहन ढमढेरे, पोशि.अभय राजपूत यांच्या पथकाने केली आहे. याप्रकरणी अभय राजपूत यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात बनावट दारूचा साठा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख करीत आहेत.