नंदुरबार l प्रतिनिधी
पाच वर्षात जिल्ह्यात शिवसेना संघटनात्मक बाबतीत मजबूत झालेली आहे.याठिकाणी युवा सेनेचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असून,युवकांनी शिवसेनेच्या भगवा झेंडा हातात घेत तो फडकतच ठेवून युवकांनी राजकारणात यावं असे आवाहन शिवसेना युवा सेनेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी केले. दरम्यान, संघटनेत काम करू इच्छिणाऱ्या १२५ जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
नंदुरबार येथे शिवकार्य सदस्यता नोंदणीच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गटाचे युवासेना विद्यापीठ व कॉलेज कक्ष उत्तर महाराष्ट्र निरीक्षक प्रथमेश पाटील, राज्य कार्यकारणी सदस्य किशोर भोसले, निखिल चौधरी,योगिता ठाकरे, श्वेता सुयोग आले असता त्यांच्या उपस्थितीत लोकनेते बटेसिंगभैया रघुवंशी सभागृहात (संजय टाऊन हॉल) येथे मंगळवार, दि.११ फेब्रुवारी रोजी मेळावा आयोजित करण्यात आला होता.
मेळाव्यापूर्वी सकाळी १० वा. दंडपाणेश्वर मंदिरात महाआरती करण्यात आली. त्यानंतर एनटीव्हीएसच्या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय व शिक्षण शास्त्र महाविद्यालयात कॉलेज कक्षाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांनी केले. ते म्हणाले,पाच वर्षात जिल्ह्यात शिवसेना संघटनात्मक मजबूत झालेली आहे.2019 नंतरची शिवसेना पाहिली तर शिवसेनेच्या एखादा सरपंच पहायला मिळाले असे. परंतु, आता शिवसेनेची ताकद वाढली असून जिल्हा परिषदेचे 7 सदस्य,1 नगरपंचायत,1 नगरपालिका बहुमताने शिवसेनेच्या ताब्यात होती. त्याचप्रमाणे 3 कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचे सभापती आहेत. त्याचप्रमाणे अनेक ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता आहे. हे यश फक्त संघटन मजबूत असल्यामुळे आहे.
यावेळी शेतकी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील, बाजार समिती सभापती संध्या पाटील,जि.प सदस्य देवमन पवार,माजी सभापती विक्रमसिंह वळवी, पं.स माजी उपसभापती संतोष साबळे, प्रल्हाद राठोड, महिला जिल्हाप्रमुख ज्योती राजपूत, माजी नगरसेवक कुणाल वसावे, रविंद्र पवार,युवा सेना जिल्हाप्रमुख योगेश पाटील, नंदुरबार विभाग युवा सेना जिल्हाप्रमुख प्रेम सोनार, युवती सेना जिल्हाध्यक्ष राजश्री मराठे,तालुकाप्रमुख राजेश वसावे, महानगरप्रमुख चेतन सुळ आदी उपस्थित होते.
*या मान्यवरांचे मार्गदर्शन*
जिल्ह्यात युवा सेनेचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. युवकांनी शिवसेनेच्या भगवा झेंडा हातात फडकतच ठेवा. युवा शिवसैनिकांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोच कराव्यात
*प्रथमेश पाटील,कॉलेज कक्ष उत्तर महाराष्ट्र निरीक्षक*
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदराव दिघे त्यांनी ज्या पद्धतीने शिवसेनेची बांधणी केली त्याच पद्धतीने युवा सैनिक देखील युवा सेनेची बांधणी करीत आहेत.
*निखिल चौधरी, सदस्य, राज्य कार्यकारणी युवा सेना*
गेल्या अडीच वर्षांच्या सत्ता काळात मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यामुळे न भूतो न भविष्यती असे यश यंदा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळाले. गाव तिथे शाखा उघडून युवकांनि राजकारणात घेण्याची गरज आहे.
*योगिनी ठाकरे, राज्य सदस्य, युवा सेना*