नंदुरबार l प्रतिनिधी
इंडीयन डेंटल असोसिशयनच्या नंदुरबार जिल्हा कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.डॉ.घन:श्याम पाटील यांची अध्यक्षपदी, सचिवपदी डॉ.कल्पेश चव्हाण तर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ.घनशाम पाटील हे नंदुरबारात गेल्या अनेक वर्षांपासून सेवा देत असून दातांच्या काळजीबाबत जनजागृतीदेखील करत आहेत. त्यांनी अनेक कठीण शस्त्रक्रीया पार पाडल्या आहेत.सामाजिक कार्यातदेखील अग्रेसर असतात.
नंदुरबार जिल्हा इंडीयन डेंटल असोसिएशनच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.यात अध्यक्षपदी डॉ.घन:श्याम पाटील सचिवपदी डॉ.कल्पेश चव्हाण तर यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या नियुक्तीने सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.