Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सरपंचांविरुद्ध अविश्वास ठरावासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन :अनय नावंदर

team by team
February 8, 2025
in राजकीय
0
सरपंचांविरुद्ध अविश्वास ठरावासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन :अनय नावंदर

नंदुरबार l प्रतिनिधी-

अक्कलकुवा तालुक्यातील मौजे कोराई येथे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच राजु तडवी यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी सोमवार 10 फेब्रूवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता ईरा इंटननॅशनल स्कुल कोराई येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे, असे सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनय नावंदर यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

अविश्वास प्रस्ताव 27 जानेवारी 2025 रोजी तीन- चतुर्थांश मतांनी संमत झाला असून उपविभागीय अधिकारी अनय नावंदर यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास ठारावावर मतदानाचे कामकाज होणार आहे.

*ग्रामसभेत हे कामकाज करण्यात येईल:*
• *मतदान प्रक्रिया:* विशेष ग्रामसभेच्या दिवशी अविश्वास ठराव संमत करण्यासाठी शिरगणना पद्धतीने साध्या बहुमताने मतदान घेण्यात येईल.
• *मतदानाचा अधिकार:* विधानसभेच्या मतदार यादीत नाव असलेल्या सर्व सदस्यांना मतदानाचा अधिकार असेल.

• *चर्चेचा विषय:* सदर विशेष ग्रामसभेचे आयोजन फक्त अविश्वास ठरावास संमती देण्यासाठी केले जाणार असल्याने इतर विषयांवर चर्चा होणार नाही.
• *ठरावाची मान्यता:* विशेष ग्रामसभेत उपस्थित राहून शिरगणना पद्धतीने मतदान केलेल्या ग्रामसभा सदस्यांच्या साध्या बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला असेल तर सदरचा अविश्वास ठराव संमत झाला असे समजण्यात येईल.

• *ठरावाची फेटाळणी:* विशेष ग्रामसभेमध्ये उपस्थित राहून मतदान केलेल्या ग्रामसभा सदस्यांच्या साध्या बहुमताने अविश्वास ठराव फेटाळला असेल तर सरपंच पद कायम राहील.
• *ओळखपत्र:* सदर विशेष ग्रामसभेस येताना ग्रामपंचायतीच्या मतदारांनी सोबत राज्य निवडणूक आयोगाने विहित केलेपैकी ओळखीचा पुरावा सोबत बाळगणे आवश्यक आहे.

कोराई ग्रामपंचायतीमधील सर्व नागरिकांना या विशेष ग्रामसभेस उपस्थित रहावे असेही आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनय नावंदर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार शहरातील मधुबन कॉलनी धाडसी घरफोडी,पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

Next Post

जिल्ह्यात परीक्षा केंद्रांवर मनाई आदेश लागू

Next Post
जिल्ह्यात परीक्षा केंद्रांवर मनाई आदेश लागू

जिल्ह्यात परीक्षा केंद्रांवर मनाई आदेश लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add