नंदुरबार l प्रतिनिधी-
अक्कलकुवा पोलीस ठाणे अंतर्गत 32 गुन्ह्यातील सुमारे 79 लाख दहा हजार रुपये किमतीचा अवैध दारू साठा पोलिसांनी दोन जेसीबीचा सहाय्याने नष्ट केला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या शंभर दिवसीय ट्रान्सफ़ॉरमेशनल प्रोग्राम कार्यक्रमा अंतर्गत न्यायालय यांचा परवानगीने मा.पो.अ. श्रवण दत्त एस, अ.पो.अ. आतिश कांबळे यांचा मार्गदर्शनाने अक्कलकुवा पोलीस स्टेशन मधील 32 गुन्ह्यातील सुमारे 79 लाख 10 हजार रुपये किमतीच्या अवैध दारू हा दि. 17 जानेवारी रोजी जामली नर्सरी येथे दुपारी 4 वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुग्गड, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटिल, उत्पादन शुल्क विभागाचे प्रणव मोरे, यांचा उपस्थितीत नष्ट करण्यात आले.