Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने वीज वितरण कंपनीला दिला शॉक

Mahesh Patil by Mahesh Patil
July 3, 2021
in क्राईम
0
नंदुरबार ! प्रतिनिधी
वीज मीटर फॉल्टी दाखवून ग्राहकाला बेकायदेशीरपणे चुकीचे वीजबिल दिल्या प्रकरणी नंदुरबार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने वीज वितरण कंपनीला चांगलाच शॉक दिला आहे. वीज ग्राहकाला देण्यात आलेले वादग्रस्त बिले रद्द करून 45 दिवसाच्या आत नवीन मीटर बसवून वीजपुरवठा सुरळीत करण्याबरोबरच मानसिक व शारीरिक त्रासापोटी दहा हजार रुपये आणि खर्च  पाच हजार रुपये असे एकूण पंधरा हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश ग्राहक निवारण आयोगाने दिला आहे.
 या प्रकरणाची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, नवापूर तालुक्यातील नवागाव येथील दिलीप आत्माराम पवार यांनी घरासाठी 1978 पासून वीज वितरण कंपनीकडून कनेक्शन घेतले आहे. तेव्हापासून ते वेळोवेळी वीज बिलांचा भरणा नियमित करीत आले आहेत. दरम्यान सन 2017 मध्ये वीज वितरण कंपनीने त्यांचे वीज मीटर फॉल्टी दाखवून सुमारे 1 लाख 64 हजार 560 रुपयांचे चुकीचे विजबिल पाठवले होते. याबाबत दिलीप पवार यांनी नवापूर येथील ग्रामीण विभागाचे सहाय्यक अभियंता यांच्याकडे लेखी तक्रार करून न्यायाची अपेक्षा केली होती. परंतु वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही. शिवाय कोणतीही पूर्वसूचना न देता घराचे वीज बंद करून मीटर जप्त केले होते. याबाबत तक्रारदार पवार यांनी अडव्हॉकेट  धनराज गवळी यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक निवारण आयोगाकडे अर्ज दाखल केला होता. त्यावर दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आला. अडव्हॉकेट धनराज गवळी यांनी प्रत्यक्ष वापर झालेले युनिट आणि वीज कंपनीने पाठवलेले चुकीचे वीज बिल यासंबंधीचे बारकाईचे  मुद्दे ग्राहक आयोगाच्या लक्षात आणून दिले. तसेच तक्रारदाराचा वीज पुरवठा खंडित असल्याने दैनंदिन आवश्यक गरजांपासून वंचित राहावे लागले आहे.  शारीरिक  मानसिक व  आर्थिक नुकसान झाल्याचा निष्कर्ष काढत ग्राहक आयोगाने आपला निकाल दिला आहे. वीज कंपनीने दिलेले वादग्रस्त देयके रद्द करून 45 दिवसाच्या आत तक्रारदार यांच्या घरी विनामोबदला नवीन वीज मीटर बसवून वीजपुरवठा सुरळीत करावा. तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी  दहा हजार रुपये आणि खर्चापोटी पाच हजार रुपये असे एकूण पंधरा हजार रुपये तक्रारदाराला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे ग्राहकांशी मनमानी करून अवाजवी विजबिल आकारणाऱ्या वीज कंपनीला चांगला झटका बसला आहे. या खटल्याचे कामकाज जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष संजय बोरवल, सदस्य श्रीमती बी .पी. केतकर, एम. एस .  बोडस यांच्या न्यायालयात चालले. तक्रारदारातर्फे एडवोकेट धनराज गवळी यांनी काम पाहिले. त्यांना ऍड. हितेंद्र राजपूत व शुभांगी चौधरी यांनी सहकार्य केले.
बातमी शेअर करा
Previous Post

प्रहार शिक्षक कर्मचारी संघटनेची शहादा तालुका कार्यकारीणी जाहीर

Next Post

एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकास ५ जुलै पर्यंत पोलीस कोठडी

Next Post

एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकास ५ जुलै पर्यंत पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार शहरातून अवैध मद्यासह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार शहरातून अवैध मद्यासह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

May 6, 2025
भालेर ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदी कविता चंद्रशेखर पाटील यांची बिनविरोध निवड

भालेर ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदी कविता चंद्रशेखर पाटील यांची बिनविरोध निवड

May 6, 2025
श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक विद्यालयात नंदनी पाटील प्रथम

श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक विद्यालयात नंदनी पाटील प्रथम

May 6, 2025
‘कामे लटकावू नका, ताबडतोब मार्गी लावा’ डॉ. विजयकुमार गावित यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

‘कामे लटकावू नका, ताबडतोब मार्गी लावा’ डॉ. विजयकुमार गावित यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

April 28, 2025
भांडे संच वाटप पुन्हा सुरू होणार; माजी मंत्री आ.डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते नोंदणीचा झाला शुभारंभ

भांडे संच वाटप पुन्हा सुरू होणार; माजी मंत्री आ.डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते नोंदणीचा झाला शुभारंभ

April 28, 2025
चावी बनविण्याच्या बहाण्याने दागिने चोरी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात

चावी बनविण्याच्या बहाण्याने दागिने चोरी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात

April 28, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group