नंदुरबार l प्रतिनिधी
घरफोडी व जबरी चोरीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
30 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा पोलीस दलातर्फे कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात सतर्कपणे कर्तव्य करीत असतांना पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नंदुरबार शहरातील मच्छी बाजार परिसरात एक इसम हा त्याच्या ताब्यात महागडे मोबाईल विक्री करण्याच्या उददेशाने फिरत आहे,
अशी खात्रीशिर माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पथकास खात्री करुन कारवाई करणेकामी सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेले बातमीनुसार नंदुरबार शहरातील मच्छी बाजार परिसरात जाऊन संशयित इसमाचा शोध घेतला असता एक इसम ईलाही चौककडे जाणाऱ्या रस्त्यावर एका घराजवळ संशईतरित्या उभा असलेला दिसुन आला, त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव साहिल ऊर्फ भुर्या सलीम वेग मिर्झा रा. पटेलवाडी, नंदुरबार असे सांगितले. त्यास त्याच्या ताब्यातील मोबाईल बाबत विचारपुस करता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यास स्था.गु.शाचे पथकाने विश्वासात घेऊन विचारपूस करता त्याने सदरचे मोबाईल हे त्याचा साथीदार रजा अब्दुल पिंजारी, रा. पटेलवाडी, नंदुरबार, रेहमान शरिफ मिस्तरी, रा.चिराग गल्लो, नंदुरबार यांच्या मदतीने सुमारे 5 ते 6 महिन्यांपुर्वी नंदुरबार शहरातील मंगळ बाजार परिसरात असलेल्या एका मोबाईल दुकानाचे शटर तोडून चोरी केले होते.बाबत सविस्तर माहिती दिली.
त्याचवेळी स्थागुशा पथकाने नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता शहर पोलीस ठाण्यात येथे भा. न्या. संहिताचे कलम 305(अ), 331(3), 331(4) प्रमाणे सदर बाबत गुन्हा दाखल असल्याची खात्री केली.
सदर ताब्यातील इसमाचे साथीदार यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. तरी साहिल ऊर्फ भूर्या सलीम बेग मिर्झा याच्याकडून एकूण 20 हजार 250 रुपये किमतीचे 2 मोबाईल हस्तगत करण्यात आले असुन त्याला शहर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे. तसेच उपनगर पोलीस ठाणे येथे दि. 30 ऑक्टोंबर 2024 रोजी मा.न्या. संहिताचे कलम 304 (2), 3(5) प्रमाणे जबरी चोरोचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरु असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, नंदुरबार शहरातील वेलनेस मेडीकलचे परिसरात एक इसम महागडे मोबाईल कमी किमतीत विक्री करीत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पथकास खात्री करुन कारवाई करणेकामी सांगितले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मिळालेले बातमीनुसार नंदुरबार शहरातील वेलनेस मेडीकल जवळ आले तेथे एका बोळीत त्यांना एक संशयित इसम दिसुन आला त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव आकाश प्रकाश पवार रा.पातोंडा, ता.जि. नंदुरबार असे सांगितले. त्यास त्याच्या ताब्यातील मोबाईल बाबत विचारपुस करता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला, त्यास स्था.गु.शा. पथकाने विश्वासात घेऊन अधिकची विचारपूस करता त्याने त्याचा साथीदार सागर (पुर्ण नाव माहित नाही) रा.धुरखेडा ता. शहादा याच्या मदतीने तीन ते चार महिन्यांपूर्वी दुचाकी वाहनावर नंदुरबार शहरातील एकता नगरजवळ दुपारचेवेळी एका महिलेच्या हातातून जबरीने मोबाईल हिसकावून चोरी केले असल्या बाबत सविस्तर माहिती दिली.
त्याचवेळी स्था.गु.शा. पथकाने उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता सदर बाबत उपनगर पोलीस ठाणे येथे वर नमूद प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची खात्री केली. तसेच सदर ताब्यात असलेल्या इसमाकडील दुसऱ्या मोबाईलबाबत विचारपूस करता सदरचा मोबाईल हा त्याने त्याचा साथीदार स्वप्नील दिलवर वळवी, रा. असालीपाडा, ता. नवापूर जि नंदुरबार याचे मदतीने दुचाकीवरुन नंदूरबार शहरातील सीबी गार्डन ते तुलसी हॉस्पीटल दरम्यान पायी चालत असलेल्या एका इसमाचे हातातून मोबाईल हिसकावून पळ काढला होता बाबत सविस्तर माहिती दिली. तरी आकाश प्रकाश पवार (भिल) यांच्याकडून एकुण 50,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल हस्तगत करण्यात आले असुन त्याला उपनगर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, पोह राकेश मोरे, विशाल नागरे, पोना मोहन ढमढेरे, विकास कापूरे, पोशि अभय राजपूत, विजय हिवरे, आनंदा मराठे यांनी केली आहे.